आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोड्याला विरोध केल्‍यामुळे विधवेवर धावत्‍या रेल्‍वेत सामुहिक बलात्‍कार

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकता - रेल्‍वेमध्‍ये लुटपाट करण्‍यास विरोध केल्‍यामुळे एक विधवा महिलेवर सामुहिक बलात्‍कार करण्‍याचा घृणास्‍पद प्रकार पश्चिम बंगालमध्‍ये घडला आहे. बर्दवान जिल्‍ह्यातील कटवा भागात धावत्‍या रेल्‍वेमध्‍ये हा प्रकार घडला आहे.
प्राप्‍त माहितीनुसार अहमदपूर-कटवा नॅरोगेज रेल्‍वेगाडीत पाच सशस्‍त्र दरोडेखोरांनी रेल्‍वेगाडी थांबवून लुटपाट सुरु केली. या पिडीत महिलेने त्‍यांचा विरोध केला. त्‍यामुळे दरोडेखोरांनी तिला गाडीबाहेर नेऊन सामुहिक बलात्‍कार केला. विरोध करणा-या इतर महिलांना मारहाण करण्‍यात आली. या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्‍णालयात पाठविण्‍यात आले आहे. घटनेनंतर अनेक महिला संघटनांनी कटवा रेल्वे स्थानकावर निदर्शने केली.
गेल्‍या काही दिवसांमध्‍ये पश्चिम बंगालमध्‍ये बलात्‍काराची ही तिसरी घटना आहे. कोलकातातील पार्क स्‍ट्रीट भागात एका एंग्‍लो भारतीय महिलेवर बलात्‍कार करण्‍यात आला होता. तर 24 उत्तर परगणा जिल्‍ह्यात एका ट्रकचालकाने एका महिलेवर बलात्‍कार करुन तिची हत्‍या केली. या घटनेत ट्रकचालकाचाचा सहायकही सहभागी होता.