आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंदुकीच्‍या धाकावर सामुहिक बलात्‍कार करुन बनविली चित्रफीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुझफ्फरनगर - एका तीस वर्षीय महिलेवर चार जणांनी सामूहिक बलात्कार करून चित्रफीत बनविण्‍याचा प्रकार उत्तर प्रदेशच्‍या मुझफ्फरनगर जिल्‍ह्यात उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील सिक्री या गावामध्ये ही घटना घडल्‍याची माहिती पोलिसांनी दिली.

यासंदर्भात पीडित महिलेने भोपा पोलिस ठाण्‍यात तक्रार दिली. त्‍यात तिने सांगितले की, रविवारी सायंकाळी घरात एकटी असताना चार जणांनी घरात प्रवेश केला. बंदुकीच्‍या धाकावर तिच्‍यावर चौघांनीही सामूहिक बलात्‍कार केला. तसेच बलात्‍काराचे त्यांनी चित्रिकरण केले.

चौघांचीही ओळख पटली असून, नौशाद, परवेझ, कमल हसन व नझर अशी चौघांची नावे आहेत. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील चौकशी सुरू आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्‍यात आली आहे. अहवाल आल्‍यानंतर गुन्‍हा दाखल करण्‍यात येईल, असे पोलिस अधीक्षक कल्‍पना सक्सेना यांनी सांगितले.

याशिवाय बलात्‍काराची आणखी एक घटना उत्तर प्रदेशमध्‍येच उघडकीस आली आहे. या घटनेत जिल्ह्यातील भादेरी गावामध्ये एका अठ्ठावीस वर्षीय विधवा महिलेवर तिच्या दिराने बलात्कार केल्याची घटना आज घडली आहे, अशी माहिती सक्सेना यांनी दिली. या महिलेच्‍या पतीचा 5 वर्षांपूर्वी मृत्‍यू झाला होता. सध्‍या ती सासू-सास-यांसोबतच राहत होती.