आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Solider How To Escap From Enmy? Air Marshal Sumeet Mukharjee

महिला सैनिक शत्रूच्या तावडीत सापडली तर? : एअर मार्शल सुमीत मुखर्जी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एखादी महिला सैनिक जर शत्रूच्या हाती लागली तर काय होईल? या प्रश्नाने युद्धाच्या आघाडीवर महिलांची तैनाती रोखून धरली आहे.

माजी एअर ऑफिसर (पर्सोनेल) एअर मार्शल सुमीत मुखर्जी यांनी ‘टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत हे सत्य उघडकीस आणले आहे. मुखर्जी म्हणाले की, अशी परिस्थिती कधीही ओढवू शकते. देश ही गोष्ट स्वीकारण्याच्या मन:स्थितीत आहे का? मुखर्जी यांनी 2008 मध्ये याविषयी अभ्यास करून अहवाल तयार केला होता. त्यावर संरक्षण मंत्रालयाने निर्णय घेतला होता की, महिला अधिका-यांना अलढाऊ शाखांमध्येच कायमस्वरूपी नियुक्त केले जाईल.

सर्वोच्च न्यायालयात सरकारचा स्पष्ट नकार
महिलांना सशस्त्र दलांमध्ये नियुक्त करण्याबाबत आणि युद्धाच्या आघाडीवर तैनात करण्याच्या विषयावर केंद्र सरकारच्या वतीने सप्टेंबरमध्ये सर्वोच्‍च न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यात आले होते. त्यात स्पष्ट म्हटले होते की, सध्या आणि भविष्यकाळातही महिलांना आघाडीवर तैनात केले जाऊ शकत नाही.