आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्‍यात तरुणीची हत्‍या, बलात्‍काराचा संशय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी- गोव्‍यात पणजीजवळ आसगाव येथील जंगलाज पोलिसांना एका तरुणीचा मृतदेह आढळला आहे. बलात्कार करून तिची हत्‍या करण्‍यात आल्‍याचा दाट संशय व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मृतदेह अंदाजे 20 वर्षीय तरुणीचा असून वि‍वस्‍त्र अवस्‍थेत पोलिसांना आढळला. दोन वनसंरक्षकांना सर्वप्रथम तिचा मृतदेह आढळला. तिची ओळख पटू नये म्‍हणून चेहरा विद्रूप करण्‍यात आला आहे. याप्रकरणी एका संशयितावर नजर असून त्‍याला लवकरच अटक करण्‍यात येईल. वनसंरक्षकांनी या संशयिताला पळून जाताना पाहिले. रणजीत तुएनकर असे त्‍याचे नाव असून तो जवळच्‍याच अंजुना गावातील रहिवासी असल्‍याची माहिती आहे. त्‍याचा शोध घेण्‍यासाठी पथक रवाना करण्‍यात आले आहे. तो फरार आहे.