आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Worker Stole 5 Crore From Panjab National Bank's Atm

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएमधून कर्मचा-यांनी चोरले 5 कोटी रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एटीएममध्ये रुपये टाकणा-या कंपनीच्या दोन कर्मचा-यांनी बँकेला पाच कोटी रुपयांना चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात गुंतलेले चार कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये पद्धतशीररीत्या चोरी करत होते. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीस अटक केली असून अन्य तिघेजण फरार आहेत.

एटीम व बँकेच्या खात्यावर 4.96 कोटी रुपयांचा फरक पडल्यानंतर या चोरीचा उलगडा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे चार कर्मचारी दुरुस्तीच्या काळात चोरी करत होते. ऑ क्टोबर 2010 ते जानेवारी 2013 पर्यंत त्यांनी अशाच प्रकारातून बँकेची तब्बल 5 कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपासात 1 कोटी 91 लाख 12 हजार 100 रुपये तीन एटीएममधून काढल्याचे पुरावे आढळले आहेत. उर्वरित रकमेचा तपास केला जात आहे. या व्यवहारात बँकेचे कर्मचारीही गुंंतले असावते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


भानगडीच्या दोन पद्धती
* आरोपी एटीएममध्ये कॅश टाकण्याच्या कंपनीत काम करत होते. देखभाल, दुरुस्तीच्या वेळेत ते 1000 रुपयांच्या नोटा 100 रुपयांच्या नोटांच्या स्लॉटमध्ये ठेवत असत. त्यानंतर डेबिट कार्डद्वारे पैसे काढून घेत असत. त्यांना 10 पट अधिक रक्कम मिळत असे. उदाहरणार्थ ते एटीएममधून 2000 रुपये काढत असतील तर त्यांना 20 हजार रुपये मिळायचे, पण नोंद मात्र 2 हजार रुपयांचीच व्हायची.
*2 यात 1000 हजाराच्या नोटांच्या स्लॉटमध्ये 100 - 100 च्या नोटा ठेवत असत. जेव्हा ते दोन हजार रुपये काढत असत तेव्हा त्यांना दोन हजार रुपयेच मिळायचे, परंतु बँकेच्या रेकॉर्डमधून 20 हजार रुपये कमी होत असत. याचा बँकेला पत्ताही लागत नसे. उरलेले 18 हजार रुपये चोर मशीनमधून काढून घेत असत.