Home »National »Other State» World's Largest Solar Telescope Planned Near Ladakh's Pangong Lake

लडाखमध्ये सर्वात मोठी सौर दुर्बीण

वृत्तसंस्था | Jan 06, 2013, 00:43 AM IST

  • लडाखमध्ये सर्वात मोठी सौर दुर्बीण

कोलकाता- लडाखमध्ये लवकरच जगातील सर्वात मोठी सौर दुर्बीण तयार होणार आहे. भारताने त्यासाठी प्रयत्न सुरू केले असून या माध्यमातून सूर्यावरील वातावरण आणि इतर घटकांचा अभ्यास करण्यात येणार आहे.


हा कोट्यवधींचा प्रकल्प आहे. लडाखमधील पँगाँग तलावापासून काही अंतरावर प्रकल्प प्रस्तावित आहे. भारत-चीन सीमेलगतचा हा प्रदेश आहे. याचवर्षी दुर्बीण तयार करण्यात येणार आहे. त्याचा कालावधी अद्याप जाहीर झाला नसला तरी लवकरच त्याचा तपशील घोषित करण्यात येईल, असे प्रकल्पाचे प्रमुख संशोधक सिराज हसन यांनी सांगितले. 100 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या पार्श्वभूमीवर हसन बोलत होते. सूर्याच्या पृष्ठभागावर असलेल्या वातावरणाचा सखोल अभ्यास करण्याच्या उद्देशाने ही सुविधा तयार करण्यात येत आहे. या दुर्बिणीच्या निर्मितीसाठी जर्मनीच्या हंबर्ग ऑब्झर्व्हेटरीचे सहकार्य घेण्यात आले आहे. एनएलएसटी असे या दुुर्बिणीच्या प्रकल्पाला नाव देण्यात आले आहे. सूर्य संशोधनाचे कुतूहल असणाºया जगभरातील खगोलप्रेमींना दुुर्बिणीच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. हे उच्च दर्जाचे साधन जगात एकमेव स्वरूपाचे असेल, असे हसन म्हणाले. बंगळुरूमधील खगोलभौतिकी क्षेत्रात काम करणारी संस्था या प्रकल्पाचे नेतृत्व करीत आहे.

अमेरिकेत मोठी दुर्बीण
अ‍ॅरिझोनामधील किट पीक नॅशनल ऑब्झर्व्हेटरीमध्ये सर्वात मोठी सौर दुर्बीण आहे. तिचा आकार 1.6 मीटर एवढा आहे.
300 कोटी रुपयांचा सौर दुर्बिणीचा प्रकल्प आहे.
कशी असेल दुर्बीण
दुर्बिणीचे मुख दोन मीटर आकाराचे असेल. 2017 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यानंतर अमेरिका पुन्हा मोठ्या आकाराची दुर्बीण तयार करणार आहे. 2020 पर्यंत अमेरिकेची दुर्बीण तयार होईल, असे अपेक्षित असून तिचा आकार चार मीटर असेल. ती हवाई येथे तयार करण्यात येईल.

Next Article

Recommended