आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yashwant Sinha Demands To Declare Narendra Modi As Prime Ministerial Candidate

मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर कराः यशवंत सिन्‍हांची मागणी, जेडीयुचे दुर्लक्ष

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- पंतप्रधानपदाच्‍या उमेदवारीवरुन राष्‍ट्रीय लोकतांत्रिक आघाडीमध्‍ये (एनडीए) द्वंद्व रंगण्‍याची चिन्‍हे दिसत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करा, अशी उघड भूमिका, भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी घेतली. तर मोदींचे विरोधक असलेले बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांच्‍या जेडीयुने सिन्‍हांच्‍या वक्तव्‍याकडे दुर्लक्ष केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना भाजपचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. भाजपमधील अनेक नेत्यांनी याबाबत अनेकवेळा बोलूनही दाखवले आहे. आज यशवंत सिन्हा यांनी उघडपणे त्‍यांची बाजू घेतली. मोदींनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्‍हणून घोषणा करावी, अशी मागणी त्‍यांनी केली. सिन्‍हा यावरच थांबले नाहीत. तर या निर्णय़ामुळे नाराज होणारे नितीश कुमार हे स्‍वतःचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत असे सांगून जेडीयुची गरज संपल्याचेही संकेत सिन्हांनी दिले. मोदींच्या उमेदवारीसाठी जनतेतून दबाव वाढत आहे आणि त्याचा भाजपला फायदाच होईल, असेही सिन्हा म्‍हणाले.

भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मात्र याबाबत सावध पावित्रा घेतला आहे. पंतप्रधानपदाच्‍या उमेदवारीबाबतचा निर्णय संसदीय मंडळ घेईल, अशी प्रतिक्रीया राजनाथ सिंह यांनी दिली. तर जेडीयुने म्‍हटले की, सिन्हा हे भाजपचे प्रवक्ते नाहीत. त्यांचे वक्तव्य पक्षाची अधिकृत भूमिका नाही. त्‍यामुळे त्‍याकडे लक्ष देणे आवश्‍यक नाही.