आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाफिज सईदला भेटणा-या मलिकचा पासपोर्ट होणार रद्द, सरकार कारवाईच्‍या तयारीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा नेता यासीन मलिकने लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबई हल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदची पाकिस्तानात जाऊन भेट घेतली. भारत सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली असून या भेटीची सविस्‍तर माहिती घेण्‍यात येत आहे. भारत सरकारने मलिकवर कारवाईची तयारी केली आहे. मलिकचा पासपोर्ट जप्‍त होण्‍याची शक्‍यता असून त्‍याला पाकिस्‍तानात जायला बंदी घालण्‍यात येण्‍याची शक्‍यता आहे.

अफझल गुरूसाठी इस्लामाबादेत घेण्यात आलेल्या शोकसभेत हाफिज सईद व यासीन मलिक व्यासपीठावर एकत्र होते. यासीन व त्याच्या समर्थकांनी अफझलच्या फाशीविरोधात 24 तासांचे उपोषणही केले होते. दरम्यान, परराष्‍ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी सांगितले की, या दोघांच्या भेटीचा तपशील तपासला जात असून गृहमंत्रालयाकडून माहिती मिळाल्यावर आपण हे प्रकरण तपासू. एका वाहिनीनुसार यासीन मलिक मर्यादा ओलांडत आहे. गृहमंत्रालय त्याच्या पाक यात्रेचा संपूर्ण तपशील तपासत आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी हा प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.