आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yeddyurappa Defiant, Not To Attend Meet Called By Gadkari ‎

गडकरींनी बोलावलेल्या बैठकीला येड्डीयुरप्पा गैरहजर राहणार

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी कर्नाटकात भाजपमध्ये सर्वकाही ‘आलबेल’ असल्याचे म्हटले असले तरी माजी मुख्यमंत्री बी.एस. येड्डीयुरप्पा यांचा मुख्यमंत्रीपदासाठीचा तोरा कायम आहे. गडकरी यांनी 3 मार्च रोजी नवी दिल्ली येथील बैठकीस आपण व समर्थक हजर राहणार नसल्याचे येड्डीयुरप्पा यांनी स्पष्ट केले आहे.
येड्डींनी आपल्या पुर्ननियुक्तीबाबत 27 फेब्रुवारीपर्यंत दिलेला अल्टिमेटम धुडकावून गडकरी यांनी सध्याचे मुख्यमंत्री सदानंद गौडा यांचे पद हटवण्यात येणार नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले होते. याबाबत येड्डीयुरप्पा म्हणाले की, दिल्लीत होणारी कर्नाटक भाजप कोअर समितीच्या बैठकीसाठी आपण जाणार नाही. मुख्यमंत्रीपद किंवा राज्य भाजप नेतृत्त्वाबाबत समर्थकांसोबत 27 फेब्रुवारी रोजी चर्चा केल्यानंतर आपण आपला अंतिम निर्णय भाजपच्या सर्वाेच्च नेत्यांना कळवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चिंतन मंथन बैठकीनंतर गडकरी यांनी सांगितले होते की, कोणत्याही पदासाठी दावा करण्यापूर्वी येड्डीयुरप्पा यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणे निकाली काढावीत. राज्यातील हेवेदावे सर्वांसमोर येऊ नये म्हणून भाजपे आपली चिंतन मंथन बैठक अर्ध्यावरच गुंडाळली होती. पक्षातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी येड्डीयुरप्पा यांनी आपल्या 69 व्या वाढदिवशी म्हणजेच 27 फेबु्रवारी राज्यातील पक्षाची बैठक बोलावली आहे.
आधी पक्षाचा विचार करा - नितीन गडकरी