आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकच्या दारी झाले एक अब्ज युजर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने सोमवारी 9 वा वाढदिवस साजरा केला. 4 फेब्रुवारी 2004 रोजी स्थापन झालेली ही साइट केवळ प्रसिद्ध झाली असे नव्हे, तर नवी क्रांतीच या साइटने घडवली. सध्या फेसबुकचे एक अब्ज अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत.

मार्क झुकरबर्ग फेसबुकचे संस्थापक सीईओ असून कॉलेजचे मित्र अ‍ॅडुआर्डो सव्हेरिन, डस्टिन मॉस्कोव्हिट्ज आणि क्रिस हग्स यांच्या साथीने त्यांनी हा प्रकल्प सुरू केला. फेसबुकने 2012 मध्ये 3.7 अब्ज डॉलरचा (सुमारे 19.71 हजार कोटी रुपये) व्यवसाय केला. 70 भाषांत ही साइट आहे.

असलेली ही साईट निम्मे यूजर्स मोबाईलवर वापरतात. कंपनीने 2012 मध्ये 16 अब्ज डॉलरचा आयपीओ लाँच केला होता. हा जगातील सर्वांत मोठा टेक आयपीओ होता. एका शेअरची किंमत होती सुमारे 2015 रुपये.

* 4 फेब्रुवारी 2004 रोजी झुकरबर्गने हार्वर्ड विद्यापीठात फेसबुक सुरू केले. सप्टेंबरमध्ये वॉल सुरू झाली.
* सप्टेंबर 2005 मध्ये फेसबुकने हायस्कूलमध्ये युजर्स वाढवले.
* मे 2006 मध्ये ई-मेल आयडीवरून फेसबुक लॉग इन करण्याची सोय.
* मे 2007 मध्ये फोटो शेअर फीचर. गेमची सुविधा.
* ऑक्टोबर 2006 मध्ये 1.6 टक्के भागीदारी मायक्रोसॉफ्टला 240 अब्ज डॉलरला विकली.
* एप्रिल 2008 मध्ये प्रोफाइल चॅट, फेब्रवारी 2009 मध्ये लाइक फीचर
* जूनमध्ये अमेरिकेतील सर्वांत मोठी सोशल नेटवर्किंग साइट झाली.
* ऑगस्ट 2010 मध्ये लोकेशन फीचर, सप्टेंबरमध्ये टाइमलाइन

विक्रमादित्य फेसबुक!
* क्वाटकास्टनुसार 2011 मध्ये दर महिन्याला सुमारे 138.9 दशलक्ष अमेरिकींची व्हिजिट
* सोशल मीडिया टुडेनुसार एप्रिल 2010 मध्ये 41.6 टक्के अमेरिकी लोकांचे फेसबुकवर खाते.
* भारतात 2012 मध्ये फेसबुकचा वापर 132 टक्क्यांनी वाढला.
* रशियात 50 लाख युजर्स, तुर्कस्तान आणि चिलीमध्ये 80 टक्के इंटरनेट युजर्स फेसबुकवर.