आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रामदेव बाबांच्या उपोषणासाठी टीम अण्णाला निमंत्रण नाही!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - योगगुरू बाबा रामदेवांचे काळ्या पैशाविरूद्धचे बेमुदत उपोषण येत्या गुरुवारपासून सुरू होणार असले तरी या उपोषणात सहभागी होण्याबाबत त्यांनी टीम अण्णाला अद्याप निमंत्रण दिलेले नाही. बाबा रामदेव यांचे निमंत्रण आम्हाला अद्याप तरी मिळालेले नाही. ते मिळाल्यानंतर पाहू, असे टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी रविवारी सांगितले.
बाबा रामदेव यांच्या उपोषणात टीम अण्णा सहभागी होणार काय, असे विचारले असता केजरीवाल यांनी ही माहिती दिली. राजकीय पर्याय स्थापण करण्याची घोषणा करून टीम अण्णाने जंतर मंतरवरील उपोषण नुकतेच संपवल्यामुळे टीम अण्णा सहभागी झाल्यास आपल्या आंदोलनाला राजकीय रंग येईल, असे वाटत असल्याने त्यांना दूरच ठेवण्याची बाबा रामदेव यांची योजना असल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी 3 जून रोजी बाबा रामदेव यांनी जंतर मंतरवर केलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणात अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी सहभागी झाले होते. तर बाबा रामदेव यांनीही जंतर मंतरवरील टीम अण्णाच्या उपोषणात हजेरी लावली होती. मात्र मागच्या रविवारी बाबा रामदेव हे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर गेल्यानंतर टीम अण्णाने त्यांच्यावर टीका केली आणि उभयतांमधील संबंध बिघडले. मात्र दुस-याच दिवशी बाबा रामदेव कोणालाही भेटण्यास स्वतंत्र आहेत, असे सांगत टीम अण्णाने सारवासारव केली होती. टीम अण्णामधील एका गटाने बाबा रामदेवांशी संबंध ठेवण्यास नेहमीच विरोध केलेला आहे.