आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पाच कारणांमुळे वाढू शकतात रामदेवबाबांच्या अडचणी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- योगगुरू रामदेव बाबांचा सहकारी बाळकृष्ण यांना बनावट दस्तऐवज प्रकरणात उत्तराखंड उच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. यामुळे रामदेव बाबा आनंदोत्सव साजरा करण्याची शक्यता आहे. परंतु यासोबत बाबांच्या अडचणीही वाढण्‍याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र सरकारने बाबांवर कारवाई करण्याची पूर्ण तयारी केली आहे. बाबांच्या प्रत्येक हलचालीवर केंद्राची नजर आहे.
दिव्य योग मंदिरात छापेपारी-
बालकृष्ण यांना जामीन मिळाल्यानंतर एका तासाच्या आत अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांनी दादूबाग येथील दिव्य योग मंदिरात छापेपारी केली. या छापेमारीमागे कॉंग्रेसचे षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया रामदेव बाबांनी दिली आहे.
कॉंग्रेसविरुद्ध खुलेआम बंड-
रामदेव बाबांनी कॉंग्रेसविरुद्ध खुलेआम बंड पुकारला आहे. उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान बाबांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांचा दौरा केला होता. तेव्हा त्यांना कॉंग्रेसच्या विरोधात जोरदार प्रचार केला होता. दिल्लीत रामलीला मैदानावर नऊ ऑगस्टला झालेल्या आंदोलनातही रामदेव बाबांनी आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव करण्याचे जनतेला आवाहन केले आहे. उत्तराखंडमध्येही कॉंग्रेसचीच सरकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी बाबांवर कारवाई करण्‍याचे संकेत दिले जाण्याची शक्यता आहे.
बनावट दस्ताऐवज सादर करून पासपोर्ट मिळवला-
रामदेव बाबांचे सहकारी बालकृष्ण यांना कोर्टाने जामीन दिला असला तरी त्यांच्यावर बनावट दस्तऐवज प्रकरणी खटला सुरू आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या सुनावणीलाही नियमित उपस्थित राहावे, असे कोर्टाने बालकृष्‍ण यांना बजावले आहे. बालकृष्ण यांच्या विरोधात ठोस पुरावे असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. बालकृष्ण यांनी बनावट दस्तऐवज सादर करून पासपोर्ट मिळवला असल्याचेही सीबीआयने कोर्टात सिद्ध केले आहे.
संसद मार्च काढून मोडला कायदा-
रामदेव बाबांवर दिल्ली पोलिस देखील लक्ष ठेऊन आहे. दिल्‍ली पोलिस सूत्रांनुसार, रामदेव बाबांनी नऊ ऑगस्टला दिल्लीत केलेल्या आंदोलनात नियमांची पायमल्ली केली आहे. आंदोलनाच्या परवानगीसाठी दिलेल्या अटींचेही बाबांनी उल्लंघन केले असल्याच दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. रामदेव बाबांनी दिल्लीत काढलेला 'संसद मार्च' देखील बेकायदेशीर होता. पोलिसांनी दिलेल्या परवानगीनुसार बाबांचे आंदोलन हे केवळ रामलीला मैदानपर्यंतच सीमित होते. परंतु त्यांनी पोलिसांचे नियम पाळले नाहीत. आंदोलनानंतर त्यांनी संसद मार्च काढून कायदा व सुव्यवस्थेत अडचणी निर्माण केल्या. दिल्ली पोलिस रामदेव बाबांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा विचार करत आहे. यासाठी पोलिस कोर्टाचे मार्गदर्शन घेणार आहे.
दिव्य योग मंदिर ट्रस्टकडे सुमारे चार कोटी रुपये सेवाकर थकीत-
रामदेव बाबांवर आयकर विभागाकडूनही कारवाई होऊ शकते. सेंट्रल एक्साइज इंटेलिजेंसच्या एका गुप्त अहवालानुसार रामदेव बाबांच्या दिव्य योग मंदिर ट्रस्टने कोट्यवधी रुपयांचा सेवाकर बुडवल्याची माहिती समोर आली आहे. सेंट्रल एक्साइज इंटेलिजेंस ही संस्था सेवा कर बुडवणार्‍या खासगी कंपन्यांची चौकशी करते. आयकर विभागाने 30 डिसेंबर 2011 रोजी दिव्य योग मंदिर ट्रस्टला चॅरिटेबलची मान्यता देण्यास नकार दिला होता. यामुळे बाबांचे दिव्य मंदिर ट्रस्ट अडचणीत सापडले आहे. सेंट्रल एक्साइज इंटेलिजेंसनुसार बाबांच्या दिव्य योग मंदिर ट्रस्टकडे सुमारे चार कोटी रुपये सेवाकर थकीत आहे.

पी. चिदंबरम क्रूर तर नवे गृहमंत्री 'सुशील'- रामदेव बाबांचे सर्टिफिकेट
रामदेव बाबांचा कॉंग्रेसविरुद्ध 'एल्‍गार', उपोषण सोडले; हरिद्वारकडे रवाना
भ्रष्टाचारात भारत 'सुवर्णपदक' पटकावेल- रामदेव बाबा