आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yogguru Ramdev Babas Culige Balkrishna Bail Sanction

योगगुरु रामदेव बाबांचा सहकारी बाळकृष्णला जामीन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैनिताल- योगगुरू रामदेवबाबांचा सहकारी बाळकृष्ण यांना बनावट दस्तऐवज प्रकरणात उत्तराखंड उच्च न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. सीबीआयने महिनाभरापूर्वी त्यांना अटक केली होती. न्या.तरुण अग्रवाल यांनी 10 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर बाळकृष्ण यांना जामीन दिल्याचे त्यांचे वकील राजेंद्र दोभाल यांनी सांगितले. जिल्हा न्यायालयाने बाळकृष्ण यांचा जामीन अर्ज दोन वेळा फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. 20 जुलै रोजी हरिद्वार येथे त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांनी सीबीआय विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला, तो फेटाळल्यानंतर बाळकृष्ण यांची 9 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
बाबा रामदेवचे सहकारी बालकृष्ण 34 कंपन्यांचे मालक
बालकृष्ण यांची सीबीआयची चौकशी सुरू