Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | -increase-strength-and-masculinity-issues-yon-simple-way

पौरुषत्व वाढविण्याचा एक साधा उपाय

dharm desk, ujjain | Update - Jun 03, 2011, 06:20 PM IST

आवश्यकतेपेक्षा अधिक मोकळीक आणि अनैसर्गिक जीवनशैली यामुळे आधुनिक मनुष्य शरीर आणि मनाने कमकुवत ...

 • -increase-strength-and-masculinity-issues-yon-simple-way

  उत्तेजक विचार, राजसिक आणि तामसिक खाण्यापिण्याने मनुष्य असंयमी आणि रोगी बनतो. आवश्यकतेपेक्षा अधिक मोकळीक आणि अनैसर्गिक जीवनशैली यामुळे आधुनिक मनुष्य शरीर आणि मनाने कमकुवत आणि रोगी बनत आहे. अन्नाने विचार बनतात आणि विचारांनी एखाद्याचे व्यक्तिमत्त्व घडते. प्रदूषित आचार, विचार, आहार आणि विहारातील अनियमीततेमुळेच आधुनिक मानवाला स्वप्नदोष, शीघ्रपतन, मधुमेह, बहूमूत्रता आणि शेवटी नपुंसकता या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा वेळी लैंगिक समस्यांपासून मुक्ती देणार-या आणि पौरुषत्व वाढविणार-या एका रामबाण योगीक उपायाची माहिती घेऊ...
  ब्रह्मचर्यासन हे असे आसन आहे की जे जेवल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी करायचे असते. या आसनाने स्वप्नदोषाची समस्या दूर होते. या आसनामुळे ब्रह्मचर्यपालन सुलभ होते.
  आसन कसे करावे
  चटईवर दोन्ही गुडघे टेकवून बसा. त्यानंतर दोन्ही पाय अशा रीतीने पसरवा की ज्यामुळे नितंब आणि गुदा जमीनीला स्पर्श करेल. हात गुडघ्यांवर ठेवून शांत चित्ताने काही क्षण बसून राहा.
  लाभ
  या आसनाच्या अभ्यासाने वीर्यवाहिनी नाडी ऊध्र्वगामी होते. सिवनी नाडीची उष्णता कमी होते. यामुळे स्वप्नदोष दूर होतो. ज्यांना वारंवार स्वप्नदोष होतो त्यांनी झोपण्यापूर्वी पाच ते दहा मिनीट हे आसन करावे. यामुळे पौरुषत्वात वाढ होते आणि मनाची एकाग्रताही वाढते.
  आसन करताना शरीराशी जोर जबदरदस्ती करू नका. अनुभवी मार्गदर्शकाच्या उपस्थितीत आसन शिकणे चांगले.

Trending