कुठे दिवा लावावा / कुठे दिवा लावावा म्हणजे पैशाची चणचण दूर होते अन् का ?

धर्म डेस्क

Aug 24,2011 04:43:05 PM IST

हिंदू धर्मानुसार पूजा करताना दिवा लावतात. ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतिक आहे दिवा. शास्त्रांनुसार पुण्यकाळात धन संपत्तीची देवी लक्ष्मी भ्रमणासाठी बाहेर पडते. घरातून कलह, दारिद्य्र, रोग आणि आर्थिक चणचण दूर करण्यासाठी पुण्यकाळी घरात दिवा लावणे शुभ असते. पावित्र्य आणि प्रकाश हे आनंदाचे प्रतिक आहेत. दिवा लावण्याने लक्ष्मी प्रसन्न होते अशी मान्यता आहे. लक्ष्मी प्रसन्न झाली की त्या घरात तिचा निवास असतो.
दररोज संध्याकाळी स्वयंपाकघरात स्टँडवर घागर पाण्याने भरून ठेवा. घागरीच्या खाली तेलाचा दिवा लावा. असे केल्याने घरातील आर्थिक अडचणी आपोआप दूर होऊ लागतील. यासोबतच प्रामाणिकपणे कष्ट करीत राहा, म्हणजे डोक्यावरचा कर्जाचा भारही आपोआप उतरू लागेल. घरातील वास्तुदोषही नष्ट होईल. वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा वाढू लागेल. घरातील विषारी सूक्ष्म कीटाणू दिव्याच्या धुराने नष्ट होतील.

X
COMMENT