Home | Jeevan Mantra | Adhyatam | 3 Habits Which Can Destroy Anyones Life

स्त्री असो वा पुरुष, कोणाचेही आयुष्य बरबाद करू शकतात हे 3 काम

जीवनमंत्र डेस्क | Update - Nov 23, 2017, 12:06 AM IST

वाल्मिकी रामायण भगवान श्रीरामाच्या जीवनावर आधारित एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. यामध्ये ज्ञान आणि धर्माच्या विविध गोष्टी सा

 • 3 Habits Which Can Destroy Anyones Life

  वाल्मिकी रामायण भगवान श्रीरामाच्या जीवनावर आधारित एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. यामध्ये ज्ञान आणि धर्माच्या विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वाल्मिकी रामायणात 3 असे काम सांगण्यात आले आहेत, जे मनुष्याला उद्ध्वस्त करू शकतात. यामुळे चुकूनही ही तीन कामे करू नयेत. येथे जाणून घ्या, कोणते आहेत ते 3 काम..


  परस्वानां च हरणं परदाराभिमर्शनम्।
  सुह्मदयामतिशंका च त्रयो दोषाः क्षयावहाः।।


  3 काम जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 • 3 Habits Which Can Destroy Anyones Life

  1. इतरांचे धन चोरणे
  जो व्यक्ती इतरांचे धन किंवा वस्तू चोरण्याचा प्रयत्न करतो, त्याला महापापी मानले जाते. एखाद्या व्यक्तीचे धन चोरल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व पुण्यकर्म नष्ट होतात. चोरी केलेल्या धनाचा आणि वस्तूचा कधीच कोणताही लाभ होत नाही, याउलट त्यामुळे नुकसानच होते. चोरी करणाऱ्या मनुष्याला तसेच त्याला मदत करणाऱ्यालासुद्धा तामिस्र नावाच्या नरकात दुःख भोगावे लागते. हे काम कोणाच्याही आयुष्याला सहजपणे उद्ध्वस्त करू शकते, यामुळे अशा कामापासून दूर राहावे.

 • 3 Habits Which Can Destroy Anyones Life

  परस्त्रीसोबत संबंध ठेवणे
  अनेक लोक कामांध होऊन परस्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहतात. अशा परिस्थितीमध्ये चांगल्या-वाईट गोष्टीचा निर्णय घेऊ शकत नाहीत आणि परस्त्रीसोबत संबंध प्रस्थापित करतात. धर्म ग्रंथामध्ये हे महापाप मानले गेले आहे. ग्रंथानुसार या पापाचे प्रायश्चित कोणत्याही प्रकारे शक्य नाही. जो व्यक्ती हे पाप करतो त्याला याचे फळ भोगावेच लागते. परस्त्रीशी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला जयंती नावाच्या नरकात पापांची शिक्षा मिळते.

 • 3 Habits Which Can Destroy Anyones Life

  आपल्या विश्वासू लोकांना धोका देणे
  आपल्या अनेक मित्र आणि नातेवाईकांचा आपल्यावर सर्वात जास्त विश्वास असतो. अशा लोकांना धोका देणे किंवा त्यांचा विश्वासघात करणे एखाद्या पापापेक्षा कमी नाही. एखाद्या विश्वासू व्यक्तीला धोका देऊन आपण काही काळ त्याचा लाभ घेऊ शकतो, परंतु भविष्यात त्याचे फळ भोगावेच लागते. असे केल्यास देवताही आपल्यावर रुष्ठ होतात आणि या कर्माच्या फळस्वरुपात आपल्याला दुःख, अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे कोणाचाही विश्वासघात करू नये.

Trending