Home | Jeevan Mantra | Adhyatam | anuman chalisa How To Pray To Lord Hanuman

हनुमान चालीसाचा उपाय, यामुळे दूर होतात 5 क्लेश आणि 6 विकार

रिलिजन डेस्क | Update - May 06, 2018, 02:59 PM IST

आजच्या काळात ज्या लोकांची तल्लख बुद्धी असेल तेच जलद गतीने यश प्राप्त करतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढली आहे.

 • anuman chalisa How To Pray To Lord Hanuman

  आजच्या काळात ज्या लोकांची तल्लख बुद्धी असेल तेच जलद गतीने यश प्राप्त करतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढली आहे. अशा स्थितीमध्ये जे लोक परिस्थिती समजून घेण्यासाठी जास्त वेळ घेतात ते यश प्राप्त करू शकत नाहीत. आज अनेक लोक क्लेश विकाराचे शिकार होऊन बसले आहेत. क्लेश म्हणजे कष्ट, मानसिक तणाव, चिंता आणि विकार म्हणजे दोष, वाईटपणा. क्लेश आणि विकार दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे नियमितपणे हनुमान चालीसाचे पाठ करणे.

  हे आहेत 5 क्लेश- अविद्या म्हणजे अज्ञान, अपमान, द्वेष, राग आणि मृत्यूची भीती.
  हे आहेत 6 विकार - वाईट सवयी म्हणजे वासना, क्रोध, लोभ, मद (नशा) मत्सर, मोह हे सहा विकार आहेत.


  हे सर्व क्लेश आणि विकार आपल्याला लक्ष्यापासून आणि योग्य मार्गावरून दूर करतात. यापासून दूर राहण्यासाठी नियमितपणे हनुमान चालीसाचे पाठ करावेत. जर तुम्हाला दररोज हनुमान चालीसाचे पाठ करणे शक्य नसेल तर आठवड्यातील दोन दिवस मंगळवार आणि शनिवारी पाठ करू शकता. जर आठवड्यातील दोन दिवसही शक्य नसेल तर एक दिवस तरी पाठ अवश्य करा. एक दिवसही पाठ करणे शक्य नसेल तर शांत एकाग्र मनाने हनुमानाचे स्मरण करून हनुमान चालीसातील कोणत्याही एका चौपाईचा (श्लोक)जप केल्यास हनुमानाची कृपा प्राप्त होऊ शकते.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणत्या चौपाईने क्लेश आणि विकार दूर होऊ शकतात...

 • anuman chalisa How To Pray To Lord Hanuman

  बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन कुमार।
  बल-बुद्धि बिद्या देह मोहिं, हरहु कलेस बिकार।।

  जर एखाद्या व्यक्तीने नियमितपणे या दोन ओळींचा 108 वेळेस जप केला तर त्याला तल्लख बुद्धी प्राप्त होऊ शकते. या जपाच्या प्रभावाने हनुमान व्यक्तीचे सर्व क्लेश आणि विकार दूर करतात. या ओळींचा अर्थ असा आहे की, "हे पवन कुमार, मी स्वतःला बुद्धिहीन समजतो आणि यामुळे तुमचे ध्यान, स्मरण करतो. तुम्ही मला बळ, बुद्धी आणि विद्या प्रदान करा. माझे सर्व कष्ट आणि दोष दूर करण्याची कृपा करा.'

  नियामिपणे हनुमान चालीसा किंवा या दोन ओळींचा जप करावा. जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग करावा. हनुमान चालीसाचा जप करण्यासाठी कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊ शकता किंवा घरीच एकांत ठिकाणी करू शकता. जप करण्यापूर्वी स्नान करून पवित्र व्हा.

Trending