आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुख हे एक ल‌क्ष्य नाही, जिथे तुम्ही पाेहाेचू शकता...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुख एखाद्या क्षितिजासारखे असते. जितके त्याच्यामागे धावाल ते तितके लांब जाईल; परंतु क्षितिज एक भ्रम अाहे, तर सुख एक यथार्थ अाहे, हे समजून घ्या. सुख मानवापासून लांब पळते. कारण मानवाच्या मनास दु:ख, नकारात्मकता, ईर्षा, महत्त्वाकांक्षा अाणि तक्रारी करण्यासाठी प्रशिक्षित केलेले असते. दु:ख हाेण्याचे बी लहान   असतानाच लावलेले असते.


संत म्हणतात की, सुख व आनंद अापली स्वाभाविक मनाेदशा अाहे; परंतु अापणास विश्वास बसत नाही. खरे तर प्रत्येक मूल अानंदित हाेऊन जन्म घेते. लहान मूल खेळताना, बागळताना किती प्रसन्न दिसते; परंतु जसजसे माेठे हाेत जाते, तसतसे गंभीर अाणि उदास हाेते. त्यांच्यावर दबाव टाकला जाताे. घरातील माेठ्या व्यक्ती त्यांना जीवनातील ज्ञान, विद्या, तर्कशास्त्र शिकवतात. दु:ख हा अामचा स्वभाव नाही. अापल्यात तणाव, ईर्षा, द्वेष, भय आदी भाव ठासून भरलेले असतात; मग दु:ख अामचा स्थायिभाव हाेऊन जाताे. अापण वर्तमानासाठी नाही तर भविष्यासाठी जगू लागताे. 


मागील वर्षी डोनाल्ड ट्रम्पचा मुलगा भारतात अाला हाेता. त्याने सांगितले, भारताची अशी परिस्थिती असताना येथील सामान्यांच्या चेहऱ्यावर खूप प्रसन्नता अाहे. ही प्रसन्नता मी संपन्न देशांतही पाहिली नाही. येथे भिकारी भीक मागतात; पण त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसते. अशा अवस्थेतही त्यांच्याकडे प्रसन्नता कशी येते? ही विचार करण्याची बाब अाहे. परंतु शिक्षण घेतलेले किंवा श्रीमंत झालेले चिंतित दिसतात, मग सुख कुठे अाहे. अात की बाहेर?

बातम्या आणखी आहेत...