Home | Jeevan Mantra | Adhyatam | Know About Bhagwan Mahavir On Mahavir Jayanti 2018

जाणून घ्या, भगवान महावीरांची पाच नावे आणि जीवनाला दिशा देणारा त्यांचा कर्मसिद्धांत...

मनोज पाटणी | Update - Mar 29, 2018, 10:45 AM IST

भगवान महावीर यांची आज जयंती. भगवान महावीरांचा जन्म अन्यायी, अत्याचारी, दुर्बल लोकांचे शोषण

 • Know About Bhagwan Mahavir On Mahavir Jayanti 2018

  भगवान महावीर यांची आज जयंती. भगवान महावीरांचा जन्म अन्यायी, अत्याचारी, दुर्बल लोकांचे शोषण, स्त्रियांचा छळ, हिंसाचार, रूढी, परंपरा या सर्व गोष्टींचे निर्मूलन करण्यासाठी झाला. महावीरांना पाच नावे होती. ही नावेसुद्धा त्यांना त्यांच्या कर्तृत्वामुळेच मिळाली.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भगवान महावीरांची पाच नावे आणि त्यामागील रहस्य...

 • Know About Bhagwan Mahavir On Mahavir Jayanti 2018

  १. वर्धमान :  जन्म होण्याच्या सहा महिने अगोदरच राजकोष, सर्वच क्षेत्रांत वृद्धी झाली, म्हणून त्यांना वर्धमान म्हणतात.  

 • Know About Bhagwan Mahavir On Mahavir Jayanti 2018

  २. सन्मती :  छोटे बाळ पाळण्यात खेळत होते. आकाशगामिनी विद्या असणाऱ्या दोन मुनिराजांनी या बाळाला बघताच त्यांच्या मनातील शंका दूर झाल्या, म्हणून ते सन्मती झाले.  

 • Know About Bhagwan Mahavir On Mahavir Jayanti 2018

  ३. वीर : स्वर्गातील संगम नावाच्या देवांनी त्यांची परीक्षा घेतली. वर्धमान मित्रांबरोबरच खेळत होते. त्या वेळी वर्धमान झाडावर चढलेले होते. या देवांनी नागाचे रूप घेतले. फुत्कार करीत येत असताना सर्व मित्र भीतीने पळून गेले, परंतु वर्धमान झाडावरच थांबले. नागाने झाडाला विळखा घातला, न भिता वर्धमान नागाच्या फणीवर पाय ठेवून खाली उतरले. ते धैर्य बघून देवांनी खरे रूप प्रकट करून बालकाला नमस्कार केला आणि त्याचे नाव वीर ठेवले. 

 • Know About Bhagwan Mahavir On Mahavir Jayanti 2018

  ४. अतिवीर : एक मदोन्मत्त हत्ती राजरस्त्यावरून वाऱ्याच्या वेगाने धावत होता. प्राणहानी होत होती. त्याला पकडणे अशक्य होते. ही गोष्ट वर्धमानाला कळताच ते त्या ठिकाणी आले. त्या हत्तीची सोंड पकडून हत्तीवर विराजमान झाले. या त्यांच्या निर्णयपराक्रमी वृत्तीमुळे त्यांना अतिवीर म्हणू लागले. 

 • Know About Bhagwan Mahavir On Mahavir Jayanti 2018

  ५. महावीर : चार घाती कर्माचा नाश करून अरिहंत अवस्था प्राप्त झाल्यावर धर्मोपदेश करीत असताना आघाती कर्माचा नाश केला. मोक्षरूपी लक्ष्मीला वरले. जन्म-मृत्यूच्या चक्रातून त्यांची सुटका झाली म्हणून त्यांना महावीर म्हणतात. 

 • Know About Bhagwan Mahavir On Mahavir Jayanti 2018

  यावरून असे लक्षात येते, की पुरुषार्थ श्रेष्ठ आहे. श्रम प्रतिष्ठा श्रेष्ठ आहे. दे रे हरी पलंगावरी, आयत्या बिळावर नागोबा बनून यश मिळत नाही. भगवान महावीरांचा सिद्धांत आणि दहा राष्ट्रीय मूल्ये एकमेकांना पोषक आहेत. श्रमप्रतिष्ठा मग ती व्यवहारात पोट भरण्यासाठी काम करणे, अर्थार्जन करणे, अशाच प्रकारे मोक्षप्राप्तीसाठी आठ कर्मांचा व अज्ञानाचा नाश करून केवलज्ञान प्राप्त करून अरिहंत अवस्था प्राप्त करणे होय. उरलेल्या चार कर्मांचा नाश करून संसारातील सर्व दु:खाचा नाश कर्मक्षय करून अनंतज्ञान, दर्शन, सुखाची प्राप्ती म्हणजे मोक्ष आहे. मग हा मोक्ष प्राप्त करण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघेही धर्म, अर्थ, काम, माक्ष हे चार पुरुषार्थ करू शकतात. आज स्त्री कोणत्याही समाजातील असो, तिने जर आपल्या पाल्यावर गर्भावस्थेपासून योग्य संस्कार केले तर निश्चित ती मुले कर्तृत्ववान घडतात, असे विज्ञान सांगते.   


  आरोग्य, धनसंपदा मिळवायची असेल तर शुचिता महत्त्वाची आहे आणि हे स्वच्छता अभियानसुद्धा कर्मच आहे. परंतु बाह्य स्वच्छतेबरोबर अंतरंग स्वच्छता म्हणजे राग, द्वेष, ईर्षा, लोभ, वासना नष्ट केली तर खऱ्या अर्थाने आनंद निर्माण होतो. कर्माविना वाचाळवृत्ती व्यर्थ आहे. आजच्या चंगळवादी संस्कृतीत मानव मानवता विसरून जात आहे. चारित्र्य संवर्धनाचा  ऱ्हास होत आहे. या सर्वांचे मूळ श्रम न करता सर्व सुख साधने मिळावी. या लालसेमध्ये आहे. यावर भगवान महावीरांनी सांगितलेल्या अहिंसा सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या तत्त्वांनुसार आचरण हा प्रभावी उपाय आहे.   

Trending