तुमचेही असेल एखाद्याशी वैर तर अवश्य जाणून घ्या, ग्रंथामधील ही 1 गोष्ट
आपले शास्त्र आणि ग्रंथ ज्ञानाचा खजिना आहेत. धर्म ग्रंथात अनेक ज्ञानाच्या गोष्टी समजवून सांगितल्या आहेत.
-
आपले शास्त्र आणि ग्रंथ ज्ञानाचा खजिना आहेत. धर्म ग्रंथात अनेक ज्ञानाच्या गोष्टी समजवून सांगितल्या आहेत. या गोष्टी आपण आपल्या जीवनात आत्मसात करणे आवश्यक आहे. यामुळे जीवन सुखी होऊ शकते. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात कोणी ना कोणी असे असते, जे त्यांच्या स्वभावाला समजू शकत नाही. आपसातील विचार न जुळाल्यामुळे दोन्ही लोकांमध्ये शत्रुत्व निर्माण होते. तो एकटा असला तरी त्याला कमकुवत समजू नये. एकटा शत्रु देखील मनुष्याचे सर्व काही नष्ट करु शकतो. या गोष्टीला आपण रामचरित मानसमधील काही ओळींच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो.
रिपु तेजसी अकेल अपि लघु करि गनिअ न ताहु।
अजहुं देत दुख रबि ससिहि सिर अवसेषित राहु।।
अर्थ - तेजस्वी शत्रु एकटा जरी असला तरी त्याला लहान समजू नये. ज्या राहुचे फक्त डोके शिल्लक राहिले होते. तो राहु आज सूर्य आणि चंद्राला दुःख देतो.
धर्म-ग्रंथातील काही रंजक गोष्टी जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा... -
एकट्या अश्वत्थामाने केला होता द्रोपदीच्या पाच पुत्रांचा वध
महाभारताच्या सौप्तिकपर्वानुसार कौरवाच्या सर्व वीरांचा नाश झाला होता. दुर्योधन देखील घायाळ होऊन धरतीवर पडला होता. कौरव पक्षातुन फक्त अश्वत्थामा आणि कृपाचार्य जिवंत राहिले होते. आपल्या शत्रु पक्षातील सर्व वीरांचा नाश करुन पांडव युध्दात आपण विजयी झालो असे समजत होते. अश्वत्थामाला एकटा आहे असे मानुन पांडवांनी त्याचा विचारच केला नाही. परंतु त्याच्या मनात पांडवांविषयी खुप राग होता. तो एकट असूनही त्याने रात्रीच्या वेळी विश्वासघाताने द्रोपदीच्या पाच पुत्रांना मारले होते. -
एकटे होते हनुमान, तरी देखील केला होता लंका विनाश
सीता माताला शोधण्यासाठी हनुमानला लंकेत पाठवले होते. हनुमान समुद्र पार करुन लंकेत पोहोचले. तेथे त्यांना अशोक वाटिकेत सीता माताला पाहिले. सीताची स्थिती पाहून हनुमान खुप दुःखी झाले. जेव्हा राक्षसांनी हनुमानाला पाहिले तेव्हा त्यांनी हनुमानला पकडून रावणाकडे नेले. रावणाने हनुमान एकटा आहे हे पाहून त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला, परंतू हनुमानाने पुर्ण लंका जाळून त्याचा नाश केला.