Home | Jeevan Mantra | Adhyatam | Life Management Of Devi Bhagvat

सुख-शांती हवी असल्यास देवी भागवतामधील या 10 गोष्टी लक्षात ठेवा

यूटिलिटी डेस्क | Update - Mar 19, 2018, 12:02 AM IST

मनुष्याने काय करावे आणि काय करू नये याचे वर्णन विविध ग्रंथ आणि शास्त्रामध्ये करण्यात आले आहे.

 • Life Management Of Devi Bhagvat

  मनुष्याने काय करावे आणि काय करू नये याचे वर्णन विविध ग्रंथ आणि शास्त्रामध्ये करण्यात आले आहे. या गोष्टी लक्षात घेऊन त्यांचे पालन केल्यास जीवन सुखी होऊ शकते. देवी भागवत महापुराणामध्ये स्वतः देवी भगवतीने 10 नियमांविषयी सांगितले आहे. या नियमांचे पालन प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या आयुष्यात करणे आवश्यक आहे.


  देवी भागवत महापुराणामधील एक श्लोक-
  तपः सन्तोष आस्तिक्यं दानं देवस्य पूजनम्।
  सिद्धान्तश्रवणं चैव ह्रीर्मतिश्च जपो हुतम्।।


  अर्थ-
  तप, संतोष, आस्तिकता, दान, देवपूजन, शास्त्रसिद्धांताचे श्रवण, लज्जा, सद्बुद्धी, जप आणि हवन- हे दहा नियम माझ्या द्वारे (देवी भगवती) करण्यात आले आहेत.


  पुराणातील या श्लोकाचा सविस्तर अर्थ जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • Life Management Of Devi Bhagvat

  1. तप
  तपश्चर्या केल्याने किंवा ध्यान लावल्याने मनाला शांती मिळते. मनुष्य जीवनात विविध गोष्टी घडत राहतात आणि प्रत्येक गोष्ट कधीकधी समजून घेणे अवघड होऊन जाते. ध्यान लावल्याने आपले मन एका ठिकाणी केंद्रित होते आणि मनही शांत होते. शांत मनाने कोणत्याही समस्येचे समाधान होऊ शकते. तसेच ध्यान लावल्याने विविध मानसिक आणि शारीरिक रोग नष्ट होतात.
   

  2. संतोष -
  मनुष्याच्या जीवनात विविध इच्छा असतात. प्रत्येक इच्छा पूर्ण करणे शक्य नसते. अशा स्थितीमध्ये मनुष्याने मनामध्ये संतोष (संतुष्टी) ठेवणे आवश्यक आहे. असंतोषामुळे मनामध्ये लालूच, ईर्ष्या यासारख्या भावना जन्म घेऊ लागतात. ज्यामुळे मनुष्य चुकीचे काम करण्यासाठी तयार होतो. सुखी जीवनासाठी या भावनांपासून दूर राहणे आवश्यक आहे. यामुळे मनुष्याने मनामध्ये नेहमी संतोष ठेवावा.

 • Life Management Of Devi Bhagvat

  3. आस्तिकता
  आस्तीकातेचा अर्थ आहे - देव-देवतांवर विश्वास ठेवणे. मनुष्याने नेहमी देवतांचे स्मरण करावे. नास्तिक व्यक्ती पशुसमान असतो. अशा लोकांसाठी चांगले-वाईट काही नसते. हे लोक वाईट कर्मसुद्धा कोणत्याही भितीशिवाय पूर्ण करतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी आस्तिकता खूप आवश्यक आहे.


  4. दान
  हिंदू धर्मामध्ये दानाचे खूप महत्त्व आहे. दान केल्याने पुण्य मिळते. दान केल्याने ग्रहदोषाचा नाश होतो. अनेकवेळा मनुष्याला त्याचं ग्रहदशेमुळे अडचणींना सामोरे जावे लागते. दान देऊन किंवा इतर पुण्य कर्म करून ग्रहदोष नष्ट केले जाऊ शकतात. मनुष्याने जीवनात नेहमीच दान-धर्म करत राहावा.

 • Life Management Of Devi Bhagvat

  5. देव पूजन
  प्रत्येक मनुष्याच्या खूप इच्छा असतात. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी चांगल्या कर्मासोबतच देवी-देवतांची पूजा करणे आवश्यक आहे. मनुष्य प्रत्येक दुःखामध्ये देवाची आठवण नक्की काढतो. सुखी जीवन आणि कुटुंबावर नेहमी देवाची कृपा राहण्यासाठी दररोज श्रद्धापूर्वक देवाची पूजा करणे आवश्यक आहे.


  6. शास्त्र सिद्धांत ऐकणे
  अनेक पुराण आणि शास्त्रामध्ये धर्म ज्ञानाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी प्राचीन काळात तसेच आजच्या काळातही खूप उपयोगी आहेत. या शास्त्र सिद्धांतांचे जीवनात पालन केल्यास कोणत्याही अडचणीवर मात करणे सहज शक्य होते. शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले सिद्धांत ऐकल्याने पुण्यसुद्धा प्राप्त होते. यामुळे शास्त्र आणि पुराणांचे अध्ययन आणि श्रवण अवश्य करावे.

 • Life Management Of Devi Bhagvat

  7. लज्जा
  प्रत्येक मनुष्यामध्ये लाज (शरम) असणे खूप आवश्यक आहे. बेशरम मनुष्य पशु समान असतो. ज्या मनुष्याच्या मनामध्ये लज्जेचा भाव नसतो तो अनेक दुष्कर्म करतो. यामुळे अनेकवेळा तो स्वतःच नाही तर कुटुंबालाही अडचणीत आणतो. मनुष्याने आपल्या मनामध्ये लज्जा भाव अवश्य ठेवावा.


  8. सदबुद्धी
  कोणत्याही मनुष्याला चांगले किंवा वाईट त्याची बुद्धी बनवते. चांगले विचार जपणारा मनुष्य नेहमी यशस्वी होतो. वाईट विचारांनी कार्य करणारा मनुष्य कधीही प्रगती करू शकत नाही. मनुष्याची बुद्धी त्याचा स्वभाव दर्शवते. यामुळे नेहमी सदबुद्धीचे पालन करावे.

 • Life Management Of Devi Bhagvat

  9. जप
  शास्त्रानुसार जीवनातील विविध समस्यांचे समाधान केवळ देवाचे नामस्मरण केल्याने होते. जो मनुष्य पूर्ण श्रद्धेने देव मंत्राचा जप करतो त्याच्यावर नेहमी देवाची कृपा राहते. देवाचे भजन-कीर्तन केल्याने मनाला शांती मिळते. शांत मनाने मनुष्य प्रत्येक कार्यात यशस्वी होतो.


  10. हवन
  कोणत्याही शुभकार्यच्या वेळी हवन केले जाते. हवन केल्याने घरातील वातावरण शुद्ध होते. हवन करताना देण्यात आलेल्या आहुतीचा एक भाग थेट देवतांना प्राप्त होतो. यामुळे घरावर नेहमी देवी-देवतांची कृपा राहते तसेच सकारात्मक उर्जा वाढते.

Trending