चुकीच्या वेळेला झोपणे / चुकीच्या वेळेला झोपणे आणि नेहमी क्रोध करणे, ज्या लोकांमध्ये असतात हे 6 दोष, ते कधी सुखी राहू शकत नाहीत

रिलिजन डेस्क

Jul 29,2018 12:03:00 AM IST

महाभारताला पाचवा वेद मानण्यात आले आहे. यामध्ये विविध अशा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे व्यक्तीचे आयुष्य बदलू शकते. या ग्रंथांमधील एका श्लोकानुसार मनुष्यामध्ये काही असे दोष असतात ज्यामुळे तो गरीब राहतो. येथे जाणून घ्या, कोणत्या दोषांपासून आपण दूर राहावे.


महाभारतामध्ये लिहिले की -
षड् दोषा: पुरुषेणेह हातव्या भूतिमिच्छता।
निद्रा तन्द्रा भयं क्रोध आलस्यं दीर्घसूत्रता।।

या श्लोकामध्ये कर्म, स्वभाव आणि व्यवहाराशी संबंधित 6 गोष्टींपासून दूर राहण्याची शिकवण देण्यात आली आहे.


पहिला दोष
या श्लोकानुसार मनुष्याने सर्वात पहिले हे काम करू नये, ते म्हणजे चुकीच्या वेळेला झोपणे. नेहमी रात्रीच्या वेळीच झोपावे आणि सकाळी लवकर उठावे. गरजेपेक्षा जास्त झोपल्याने गरिबीला आमंत्रण देण्यासारखे आहे.


दुसरा दोष
व्यक्तीचा स्वतःवर आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. आत्मविस्वास नसल्यास व्यक्ती आयुष्यत कधीही यशस्वी होऊ शकत नाही. कोणतेही नवीन काम सुरु करताना पूर्ण विश्वासाने सुरु करावे.


तिसरा दोष -
भीती हासुद्धा एक मोठा दोष आहे. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये भीती असेल तो कोणत्याही कामामध्ये यशस्वी होऊ शकत नाही.


चौथा दोष -
आळस असा दोष आहे ज्यामुळे मनुष्य वर्तमान आणि भविष्य दोन्ही गोष्टीचा नाश करतो. आळसामुळे व्यक्तीची प्रगती कधीच होऊ शकत नाही.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन दोष...

पाचवा दोष - क्रोधामुळे व्यक्ती कोणताही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. क्रोधामध्ये करण्यात आलेले काम राक्षसी असते. अशा कामांमधून यश प्राप्त होत नाही.सहावा दोष - वेळेचे भान न ठेवणारा व्यक्ती कधीही सुखी राहू शकत नाही. यामुळे प्रत्येक काम ठरलेल्या वेळेवर करणे आवश्यक आहे.

पाचवा दोष - क्रोधामुळे व्यक्ती कोणताही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. क्रोधामध्ये करण्यात आलेले काम राक्षसी असते. अशा कामांमधून यश प्राप्त होत नाही.

सहावा दोष - वेळेचे भान न ठेवणारा व्यक्ती कधीही सुखी राहू शकत नाही. यामुळे प्रत्येक काम ठरलेल्या वेळेवर करणे आवश्यक आहे.
X
COMMENT