आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या दुर्गुणापासून नेहमी राहा दूर, अन्यथा पदरी पडेल दुर्गती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत:च्या चुकांकडे कानाडोळा करण्याची माणसाची वृत्ती असते. परंतु माणूस दुस-यांच्या चुका शोधण्यात मात्र पुढे असतो. आपल्यात असलेले दोषच आपण दुस-यांमध्ये शोधत असतो, हे कटुसत्य आहे. कधीकधी आपल्या चुका झाकण्यासाठीही काही लोक इतरांच्या चुका दाखविण्याचा प्रयत्न करतात. स्वार्थपूर्ती न झाल्यानेही काहीजण दोषाचे खापर इतरांवर फोडतात.


शास्त्रांमध्ये या दोषाचे वर्णन परदोष दर्शन नावाने करण्यात आले आहे. दुस-यांतील दोष शोधण्याची वृत्ती भक्तीमार्गातील अडथळा आहे. इतकेच काय व्यावहारिक जीवनातही बाधक आहे. निंदा, दोष दर्शन या बाबी व्यवहार आणि कर्म बिघडवतात. भगवदगीतेतही दुस-यांचे वाईट करू नका, असे म्हटले आहे. रामचरितमानस ग्रंथात प्रभू श्रीराम शबरीमातेला म्हणतात की स्वप्नातही दुस-यांचे दोष दाखवू नये. यामुळे मनुष्य दुर्गतीला जाऊन मिळतो.


- निंदेमुळे स्वताच्या श्रेष्ठतेचा गंड निर्माण होतो. माणसाच्या पतनाचे एक प्रमुख कारण अहंकार आहे.
- दुस-यांच्या त्रुटींविषयी विचार करण्यामुळे आपले मनही अशा विचारांनीच भरले जाते. यामुळे आपल्या आचरणावरही परिणाम होतो.
- धर्मशास्त्रांनुसार जर कोणी वाईट कर्म करीत असेल तर त्याविषयी वारंवार चर्चा केल्यामुळे निंदा करणारा आणि ऐकणाराही त्या पापाचा भागीदार बनतो.
- वारंवार चुका शोधण्यामुळे एखाद्याप्रती मनात प्रेमाचा अभाव निर्माण होऊन द्वेषभावना वाढीस लागते. शेवटी चुका शोधणा-याचेच नुकसान होते.

बातम्या आणखी आहेत...