5 चौपाई : यांचे स्मरण केल्याने दूर होतात सर्व अडचणी
जीवनमंत्र डेस्क | Update - Oct 09, 2017, 03:20 PM IST
बजरंगबली हनुमानाला प्रसन्न करण्याचा सर्वात अचूक उपाय म्हणजे हनुमान चालीसाचे पाठ करणे.
-
बजरंगबली हनुमानाला प्रसन्न करण्याचा सर्वात अचूक उपाय म्हणजे हनुमान चालीसाचे पाठ करणे. हे पाठ केल्याने भक्ताच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. हनुमान चालीसातील प्रत्यक चौपाई चमत्कारिक आहे. आज आम्ही तुम्हाला हनुमान चालीसामधील काही निवडक चौपाईंचा अर्थ सांगत आहोत. या चौपाईंचा जप केल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात.
असा करावा जप -
एखाद्या चौपाईचा जप करण्याची इच्छा असेल तर जपाची संख्या कमीतकमी 108 असावी. जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग करावा. हनुमान चालीसाचा जप करण्यासाठी कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊ शकता किंवा घरीच एकांत ठिकाणी जप करू शकता. जप करताना हनुमानाचे ध्यान करावे. व्यर्थ विचार मानाम्ह्द्ये आणू नयेत. एकाग्रतेने जप केला तरच शुभफळ प्राप्त होऊ शकतात.
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन कुमार।
बल-बुद्धि बिद्या देह मोहिं, हरहु कलेस बिकार।।
जर एखाद्या व्यक्तीने नियमितपणे या दोन ओळींचा 108 वेळेस जप केला तर त्याला तल्लख बुद्धी प्राप्त होऊ शकते. या जपाच्या प्रभावाने हनुमान व्यक्तीचे सर्व क्लेश आणि विकार दूर करतात. या ओळींचा अर्थ असा आहे की, "हे पवन कुमार, मी स्वतःला बुद्धिहीन समजतो आणि यामुळे तुमचे ध्यान, स्मरण करतो. तुम्ही मला बळ, बुद्धी आणि विद्या प्रदान करा. माझे सर्व कष्ट आणि दोष दूर करण्याची कृपा करा.'
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चौपाईंचा अर्थ.... -
या चौपाईने बुद्धी प्राप्त होते -
जो व्यक्ती या चौपाईचा जप करतो त्याला सुबुद्धी प्राप्त होते. या चौपाईचा जप केल्याने व्यक्तीचे कुविचार नष्ट होऊन सुविचार निर्माण होतात. वाईटापासून मन दूर राहते आणि चांगल्या कामामध्ये आवड निर्माण होते.
अर्थ - बजरंगबली महावीर असून कुमती (वाईट बुद्धी) दूर करतात आणि सुमती (चांगली बुद्धी) प्रदान करतात. -
या चौपाईने विद्या प्राप्त होते -
ज्या व्यक्तीला विद्या धनाची इच्छा असेल त्याने या चौपाईचा जप करावा. या जपाने व्यक्तीला विद्या आणि चातुर्य प्राप्त होते. त्याचबरोबर हृदयामध्ये श्रीरामाची भक्ती वाढते.
अर्थ- हनुमान विद्यावान आणि गुणवान तसेच चतुर आहेत. ते नेहमी श्रीरामाच्या सेवेत तत्पर राहतात. जो व्यक्ती या चौपाईचा जप करतो, त्याला हनुमानाप्रमाणे विद्या, गुण, चातुर्यासोबतच श्रीरामाची भक्ती प्राप्त होते. -
शत्रूची भीती दूर करण्यासाठी या चौपाईचा जप करावा
जेव्हा तुम्ही शत्रूमुळे अडचणीत पडाल आणि बाहेर निघण्याचा कोणताच मार्ग सापडत नसेल तर हनुमान चालीसातील या चौपाईचा जप करा. एकाग्र आणि शांत मनाने एकांत ठिकाणी या चौपाईचा 108 वेळेस जप केल्यास शत्रूंवर सहज विजय प्राप्त होईल. श्रीरामाची कृपा प्राप्त होते.
अर्थ - श्रीराम आणि रावणाच्या युद्धामध्ये हनुमानाने भीम रुपात म्हणजे विशाल रूप धारण करून राक्षसांचा संहार केला होता. श्रीरामाचे काम पूर्ण करण्यात हनुमानाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. ज्यामुळे श्रीरामचे सर्व कार्य पूर्ण होत गेले. -
जो व्यक्ती या चौपाईचा जप करतो त्याला शारीरिक कमजोरीतून मुक्ती मिळते. या चौपाईचा अर्थ असा आहे की, हनुमान श्रीरामचे दूत असून अतुल्य बळाचे धाम आहेत. हनुमान परम शक्तिशाली आहेत. हनुमानाच्या आईचे नाव अंजनी असल्यामुळे यांना अंजनी पुत्र म्हटले जाते. शास्त्रानुसार हनुमानाला पवन देवाचा मुलगा मानले जाते, याच कारणामुळे यांना पवनसुत असेही संबोधले जाते.