Home | Jeevan Mantra | Adhyatam | Mahabharata And Ramayanas Facts In marathi

या 5 गोष्टींपासून दूर राहिल्यास राहाल फायद्यात अन्यथा होईल खूप नुकसान

जीवनमंत्र डेस्क | Update - Jun 14, 2017, 02:16 PM IST

शास्त्रामध्ये असे विविध उदाहरणे देण्यात आले आहरत, ज्यामधून आपल्याला सुखी जीवनासाठी कोणकोणत्या गोष्टींपासून दूर राहावे हे समजू शकते.

 • Mahabharata And Ramayanas Facts In marathi
  शास्त्रामध्ये असे विविध उदाहरणे देण्यात आले आहरत, ज्यामधून आपल्याला सुखी जीवनासाठी कोणकोणत्या गोष्टींपासून दूर राहावे हे समजू शकते. येथे अशाच 5 गोष्टींविषयी जाणून घ्या, ज्यामुळे तुम्ही आयुष्यात सुखी राहू शकता.

  अत्याधिक मोह -
  कोणत्याही गोष्टीबद्दल अधिक मोह करणे अडचणींचे कारण बनते. अनेक लोक मोहापायी योग्य आणि अयोग्यामधील अंतर विसरून जातात. मोहाला मुळाचे प्रतिक मानले जाते. मूळ म्हणजे हे व्यक्तीला पुढे जाऊ देत नाही, बांधून ठेवते. मोहाच्या आधीन झालेला व्यक्ती स्वतःच्या बुद्धीचा योग्य उपयोग करू शकत नाही. व्यक्ती पुढे सरकला नाही तर यश कसे संपादन करणार.
  राजा धृतराष्ट्र यांना दुर्योधन, हस्तिनापुर आणि सिंहासनाचा अत्याधिक मोह होता. याच कारणामुळे त्यांनी दुर्योधनाच्या प्रत्येक अधार्मिक कार्याला दुर्लक्षित केले. या मोहामुळे कौरवांचा सर्वनाश झाला.

  पुढे जाणून घ्या, इतर 4 खास गोष्टी...

 • Mahabharata And Ramayanas Facts In marathi
  अहंकार -
  अहंकार म्हणजे स्वतःला श्रेष्ठ आणि इतरांना तुच्छ समजणे. जे लोक फक्त मीपणा आणि अहंपणामध्ये जगतात, ते जीवनात कधीही यश प्राप्त करू शकत नाहीत. एखाद्या कामामध्ये यश मिळाले तरी ते स्थायी नसते. अहंपणाची भावना व्यक्तीच्या पतनाचे कारण ठरते. अहंकाराची अनेक उदाहरणे शास्त्रामध्ये सांगण्यात आली आहेत. रावणाने श्रीरामाला तुच्छ समजले होते. दुर्योधनाने सर्व पांडवाना तुच्छ समजले होते. याचे परिणाम समोर आहेत, रावण आणि दुर्योधनाचा अंत झाला.
 • Mahabharata And Ramayanas Facts In marathi
  अज्ञान किंवा अपूर्ण ज्ञान -
  कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी त्या कामाशी संबंधित संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. अज्ञान किंवा अपूर्ण ज्ञान नेहमी अडचणी निर्माण करते. यामुळे व्यक्तीने नेहमी ज्ञान अर्जित करत राहावे. एखाद्या विषयाची जासित जास्त माहिती असल्यास व्यक्ती चांगल्या-वाईट कामामध्ये योग्य निर्णय घेऊ शकतो.

  अज्ञान किंवा अपूर्ण ज्ञान कशाप्रकारे अडचणीत आणू शकते याचे श्रेष्ठ उदाहरण महाभारतामध्ये आढळून येते. महाभारत युद्धामध्ये कौरवांनी तयार केलेल्या चक्रव्युहमध्ये अभिमन्युने प्रवेश केला. चक्रव्यूहमध्ये प्रवेश करण्याचे ज्ञान त्याला होते परंतु त्यातून बाहेर पडण्याचे ज्ञान नव्हते. या कारणामुळे तो चक्रव्यूहमध्ये अडकला आणि मृत्युमुखी पडला. ठीक अशाचप्रकारे अपूर्ण ज्ञान आपल्याला अडचणीमध्ये आणू शकते.
 • Mahabharata And Ramayanas Facts In marathi
  क्रोध -
  जर एखाद्या व्यक्तीच्या मानतील गोष्ट पूर्ण झाली नाही तर त्याला राग येणे स्वाभाविक आहे. जे लोक या क्रोधावर नियंत्रण मिळवतात त्यांना निकट भविष्यातील कामामध्ये यश अवश्य मिळते. याउलट जे लोक क्रोधावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, ते आवेशात येउन चुकीचे काम करतात. यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते.
  रामायणात रावणाने रागात येउन विभिषणाला लंकेतून बाहेर काढले. त्यानंतर विभीषण श्रीरामाला शरण गेले. युद्धामध्ये विभीषणनेच श्रीरामाला रावणाच्या मृत्यूचे रहस्य सांगितले होते.
 • Mahabharata And Ramayanas Facts In marathi
  असुरक्षेची भावना किंवा मृत्यूची भीती -
  ज्या लोकांच्या मनामध्ये असुरक्षेची भावना असते, ते कोणतेही कार्य एकाग्रतेने पूर्ण करू शकत नाहीत. प्रत्येक क्षणी स्वतःला असुरक्षित समजतात आणि स्वतःला सुरक्षित करण्याच्या विचारात राहतात.
  कंस राजाला जेव्हा आकशवाणीने समजे की, देवकीचा आठवा पुत्र त्याच्या मृत्यूचे कारण बनेल तेव्हा तो घाबरला. मृत्युच्या भीतीने त्याला असुरक्षित वाटू लागले. या भीतीमुळे त्याने देवकीच्या मुलांना जन्मताच मारून टाकण्याचे दुष्कर्म केले. लाख प्रयत्न करूनही ती श्रीकृष्णाला मारू शकला नाही आणि शेवटी त्याचाच अंत झाला.

Trending