Home | Jeevan Mantra | Adhyatam | Mahabharata These Works Are Less Our Age

कोणत्या कामांमुळे कमी होते मनुष्याचे आयुष्य, लिहिले आहे महाभारतामध्ये

जीवनमंत्र डेस्क | Update - Oct 23, 2017, 11:25 AM IST

हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगितलेल्या विविध गोष्टी आपल्यासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाहीत, परंतु धर्म ग्रंथाचे वाचन न

 • Mahabharata These Works Are Less Our Age
  हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगितलेल्या विविध गोष्टी आपल्यासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाहीत, परंतु धर्म ग्रंथाचे वाचन न केल्यामुळे आपण या गोष्टींपासून अनभिज्ञ राहतो. प्राचीन ग्रंथानुसार पूर्वी मनुष्याचे आयुष्य 100 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असायचे परंतु सध्याच्या काळात मनुष्याच्या आयुष्यामध्ये घट झालेली दिसून येत आहे.

  याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्याद्वारे दररोज करण्यात येणारी काही कामे, ज्यामुळे मनुष्याचे आयुष्य कमी होत चालले आहे. महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये मनुष्याचे आयुष्य वाढवणारे आणि कमी करणारे कर्म यासंबंधी सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे. या गोष्टी भीष्म पितामह यांनी युधिष्टिराला सांगितल्या होत्या.

  1- जो मनुष्य नखं कुरतडतो तसेच नेहमी अशुद्ध आणि चंचल राहतो, त्याचे आयुष्य लवकरच समाप्त होते. उदय, अस्त, ग्रहण व दिवसा सूर्याकडे पाहणाऱ्या मनुष्याचा मृत्यू अल्पायुतच होतो.

  कोणकोणती कामे केल्याने मनुष्याचे आयुष्य वाढते किंवा घटते हे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

 • Mahabharata These Works Are Less Our Age
  - केशभूषा करणे, डोळ्याला काजळ लावणे, दात घासणे आणि देवतांचे पूजन करणे. ही सर्व कामे दिवसाच्या पहिल्या प्रहरातच पूर्ण करावीत. जे लोक ही सर्व कामे वेळेवर करीत नाहीत त्यांना लवकरच काळाला सामोरे जावे लागते.

  - मल-मुत्राकडे पाहणारा, पायावर पाय ठेवून बसणारा, दोन्ही पक्षातील चतुर्दशी आणि अष्टमीला तसेच अमावस्या व पौर्णिमेला दिवसा स्त्री समागम करणाऱ्या मनुष्याचा मृत्यू कमी वयात होतो.
 • Mahabharata These Works Are Less Our Age
  - नास्तिक, क्रियाहीन, गुरु आणि शास्त्राच्या आज्ञेचे उल्लंघन करणारे तसेच धर्म माहित नसलेल्या दुराचारी मनुष्याचे आयुष्य कमी असते. जो मनुष्य इतर जाती किंवा धर्मातील स्त्रीशी संपर्क ठेवतो, त्याचे आयुष्यही लवकर समाप्त होते.

  - क्रोधहीन, नेहमी सत्य बोलणारा, हिंसा न करणारा, सर्वांना एकसमान वागणूक देणार्या मनुष्याचे आयुष्य १०० वर्षांचे असते. दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्म झाल्यानंतर प्रातःकाळी आणि संध्याकाळी विधीपूर्वक संध्या करणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य जास्त असते.
 • Mahabharata These Works Are Less Our Age
  - जो मनुष्य सूर्योदयापर्यंत झोपतो आणि त्याचे प्रायश्चितही करत नाही, त्याचा विनाश निश्चित होतो. मंजन कधीही तर्जनीने (अंगठ्याजवळील पहिले बोट) करू नये, तर मध्यमा अर्थात सर्वात मोठ्या बोटाने करावे. कारण तर्जनीत एक प्रकारचा विद्युत प्रवाह असतो, ज्यामुळे तो दातांमध्ये प्रविष्ट झाल्यावर ते तत्काळ कमकुवत होण्याची शक्यता असते. 

  - ब्राह्मण, गाय, राजा, वृद्ध, गरोदर स्त्री, दुर्बल आणि ओझे वाहून नेणारा व्यक्ती समोर आल्यानंतर स्वतः मागे सरकून त्यांना मार्ग द्यावा. इतरांनी वापरेलेले चप्पल-बूट, वस्त्र धारण करू नयेत. इतरांची चाहाडी, निंदा करू नये. अपंग, कुरूप व्यक्तीवर हसू नये. जो मनुष्य या सर्व गोष्टींचे पालन करतो त्याला दीर्घायुष्य प्राप्त होते.
 • Mahabharata These Works Are Less Our Age
  - मलिन आरशात चेहरा पाहणारा, गरोदर स्त्रीसोबत समागम करणारा तसेच तुटलेल्या, अंधारात असलेल्या पलंगावर झोपणारा मनुष्य लवकरच यमदेवाचे दर्शन घेतो.

  - उत्तर दिशेकडे तोंड करून मल-मूत्राचा त्याग करावा. दात घासल्याशिवाय देवपूजा करू नये. कधीही नग्नावस्थेत किंवा रात्री स्नान करू  नये. नास्तिक लोकांच्या संगतीत राहू नये. स्नान केल्याशिवाय चंदन लावू नये. स्नान झाल्यानंतर ओले कपडे परिधान करू नयेत. या सर्व गोष्टींचे पालन करणारा मनुष्य १०० वर्षांचे सुख भोगू शकतो.
 • Mahabharata These Works Are Less Our Age
  - डोक्याला तेल लावल्यानंतर त्याच हाताने इतर अवयवांना स्पर्श करू नये. उष्ट्या तोंडाने शिकवणे, शिकणे योग्य नाही. असे केल्यास आयुष्याचा नाश होतो.

  - गुरुजनांसमोर त्यांच्याहून उच्च आसनावर बसू नये, पायावर पाय ठेवून बसू नये आणि त्यांच्या वचनांचे तर्काद्वारे खंडन करू  नये. दान, मान आणि सेवेने अत्यंत पूजनीय व्यक्तीची सदैव पूजा करावी.
 • Mahabharata These Works Are Less Our Age
  - जो मनुष्य अपवित्र व्यक्तीला पाहतो, स्पर्श करतो, कुमारिका, कुलटा, वेश्येसोबत समागम करतो, पत्नीसोबत दिवसा तसेच रजस्वला अवस्थेमध्ये समागम करतो. त्याला यमदेव लवकरच घेऊन जातात.

  - पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून दाढी-हजामत केली पाहिजे. यामुळे आयुष्य वाढते. दाढी-हजामत केल्यानंतर स्नान न करणे हे आयुष्य क्षीण करणारे आहे.
 • Mahabharata These Works Are Less Our Age
  - अपवित्र अवस्थेमध्ये सूर्य, चंद्र आणि नक्षत्रांकडे पाहणारा, वडीलधारी मंडळी समोर आल्यानंतर नमस्कार न करणारा, फुटलेल्या ताटाचा वापर करणारा व्यक्ती जास्त वर्ष जगत नाही.

  - जो मनुष्य जेवताना मधेच उठतो आणि स्वाध्याय करतो, यमदेव त्यांचे आयुष्य नष्ट करतात आणि त्याच्या आपत्यांनाही त्याच्यापासून हिरावून घेतो. जे लोक सूर्य, अग्नी, गाय तसेच ब्राह्मणाकडे तोंड करून मुत्र त्याग करतात, त्या सर्वांचे आयुष्य कमी होते.
 • Mahabharata These Works Are Less Our Age
  - भुस्सा, भस्म, केस आणि कवटीवर कधीही बसू नये. इतरांनी स्नान करण्यासाठी वापरलेल्या पाण्याचा वापर करू नये. जेवण नेहमी खाली बसून करावे. या सर्व गोष्टींचे पालन करणारा व्यक्ती १०० वर्ष जगतो.

  - धान्य पेरलेल्या शेतात, घराच्या जवळपास तसेच पाण्यामध्ये मल-मुत्र त्याग करणारा, ताटात वाढलेल्या अन्नाची निंदा करणारा, जेवणापूर्वी आचमन न करणारा व्यक्ती अल्पायुषी असतो.
 • Mahabharata These Works Are Less Our Age
  - जो मनुष्य संध्याकाळी झोपतो, वाचतो आणि जेवण करतो. रात्रीच्या वेळी श्राद्ध कर्म करतो, स्नान करतो, जेवण झाल्यानंतर केस विंचरतो. असा व्यक्ती जास्त काळ जगात नाही.

  - जिचे गोत्र आणि कुळ आपल्यासारखेच असेल तसेच जी मामाच्या कुळात जन्मलेली असेल, जिच्या कुळाचा काही पत्ता नसेल त्या मुलीशी लग्न करू नये.
 • Mahabharata These Works Are Less Our Age
  - दीर्घायुष्याची इच्छा असणार्या मनुष्याने घरापासून दूर जाऊन मुत्र त्याग करावा त्यानंतर हात-पाय धुवून घरामध्ये प्रवेश करावा. घरातील उरलेले अन्न घरापासून दूर टाकावे किंवा पाळीव प्राण्यांना खाऊ घालावे. लाल फुलांचा हार स्वतः घालू नये. पांढर्या फुलांचा हार घालू शकता.

  - पूर्व आणि उत्तरेकडे तोंड करून जेवण केल्याने क्रमशः दीर्घायुष्य व सत्याची प्राप्ती होते. जमिनीवर बसूनच जेवण करावे. कोणासोबत एकाच ताटात तसेच अपवित्र मनुष्याजवळ बसून जेवण करू नये.
 • Mahabharata These Works Are Less Our Age
  - दीर्घायुष्याची इच्छा असणार्या मनुष्याने पिंपळ, वड, उंबर या झाडांच्या फळांचे सेवन करू नये. हातावर मीठ घेवून चाटू नये. शत्रूच्या श्राद्ध कर्मातील अन्न ग्रहण करू नये.

  - वृद्ध, कुटुंबातील सदस्य, गरीब मित्र यांना घरामध्ये आश्रय द्यावा. पारवा, पोपट, मैना इत्यादी पक्षी घरात ठेवणे मंगलकारी आहे. विद्वान, हुशार, पंडित या लोकांची निंदा केल्यास आयुष्य कमी होते.
 • Mahabharata These Works Are Less Our Age
  - निषिद्ध वेळेमध्ये अध्ययन करू नये. असे केल्यास ज्ञानाचा, आयुष्याचा नाश होतो. माल-मूत्राचा त्याग दिवसा उत्तराभिमुख(उत्तरेकडे तोंड करून) आणि रात्री दक्षिणाभिमुख (दक्षिणेकडे तोंड करून) केल्यास आयुष्याचा नाश होत नाही.

  - पलंगावर आडवे-तिडवे झोपू नये, नेहमी सरळ झोपावे. नास्तिक व्यक्तीसोबत कोठेही जाऊ नये. आसनाला पायाने ओढून त्यावर बसू नये. स्नान केल्याशिवाय चंदन लावू नये. जो मनुष्य ही कामे करतो यमदेव त्याचे प्राण लवकर हरण करतात.

Trending