Home | Jeevan Mantra | Adhyatam | Marriage Place Of Lord Shiv And Goddess Parvati

महेश नवमी : येथे झाले होते शिव-पार्वतीचे लग्न, अजूनही आहेत विवाहाच्या खुणा...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 03, 2017, 09:53 AM IST

आज आम्ही तुम्हाला महेश नवमी (3 जून, शनिवार)च्या निमित्ताने महादेव-पार्वतीच्या विवाहाविषयी माहिती देत आहेत.

 • Marriage Place Of Lord Shiv And Goddess Parvati
  आज आम्ही तुम्हाला महेश नवमी (3 जून, शनिवार)च्या निमित्ताने महादेव-पार्वतीच्या विवाहाविषयी माहिती देत आहेत. महादेवाला पतिच्या रुपात मिळवण्यासाठी पार्वती देवीने कठोर तपस्या केली होती. पार्वची देवीच्या कठोर तपस्येनंतर महादेवाने त्यांच्या विवाहाच्या प्रस्तावाला स्वीकारले होते. मान्यते प्रमाणे महादेव आणि पार्वतीचा विवाह उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात झाला होता.
  त्रिर्युगी हे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील एक गाव आहे. असे म्हटले जाते की, याच गावात महादेव आणि पार्वतीचे लग्न झाले होते. या गावात विष्णु देव आणि लक्ष्मी देवीचे एक मंदिर आहे. ज्याला महादेव-पार्वती विवाह स्थळाच्या रुपात ओळखले जाते. या मंदिराच्या परिसरात अशा अनेक गोष्टी आजही उपलब्ध आहे, ज्यांचा संबंध महादेव-पार्वतीच्या विवाहासोबत असल्याचे मानले जाते.
  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या महादेव पार्वतीच्या विवाहाच्या काही खुणांविषयी...

  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 • Marriage Place Of Lord Shiv And Goddess Parvati
  याच ठिकाणी बसुन झाला होता महादेव-पार्वतीचा विवाह
  या ठिकाणी महादेव-पार्वती विवाह करताना बसले होते. याच ठिकाणी ब्रह्मदेवाने महादेव-पार्वतीचा विवाह लावून दिला होता.
   
   9*
   
   
 • Marriage Place Of Lord Shiv And Goddess Parvati
  अखंड धुनी
  ही त्रिर्युगी नारायण मंदिराची अखंड धुनी आहे. महादेवाने याच कुंडाच्या भोवती पार्वतीसोबत फेरे घेतले होते. आजही या कुंडामधील अग्नी विझलेली नाही. या मंदिरात लाकडांना प्रसादाच्या रुपात चढवले जाते. या पवित्र अग्नि कुंडाची राख श्रध्दाळू घरी घेऊन जातात. वैवाहिक जीवनात येणा-या समस्या दूर करण्यासाठी ही राख फायदेशीर आहे असे म्हटले जाते.
  *
   
 • Marriage Place Of Lord Shiv And Goddess Parvati
  ब्रम्हकुंड
  हा ब्रम्हकुंड आहे. महादेव-पार्वतीच्या विवाहात ब्रम्ह देव पुरोहित बनले होते. याच कुंडात ब्रम्हदेवाने विवाहाच्या अगोदर स्नान केले होते. याच कारणामुळे याला ब्रम्ह कुंड म्हटले जाते. तीर्थयात्री या कुंडात अंघोळ करुन ब्रम्ह देवाचा आशिर्वात प्राप्त करतात.
  *
   
 • Marriage Place Of Lord Shiv And Goddess Parvati
  विष्णु कुंड
  हे विष्णु कुंड आहे. महादेव-पार्वतीच्या लग्नात विष्णु देवाने पार्वतीच्या भावाची भुमिका निभावली होती. एक भाऊ आपल्या बहिणीसाठी लग्नात ज्या रिती निभावतो त्या सर्व रिती विष्णु देवानी निभावल्या होत्या. अशी मान्यता आहे की,  या कुंडात अंघोळ करुन विष्णु देवाने विवाह सहभाग घेतला होता. 
  *
   
 • Marriage Place Of Lord Shiv And Goddess Parvati
  या स्तंभावर महादेवाला दानमध्ये मिळालेली गाय बांधली होती. 
  महादेवाला लग्नात दानमध्ये गाय मिळाली होती. मानले जाते की, याच स्तंभावर ती गाय बांधली होती.
   
  *
   
 • Marriage Place Of Lord Shiv And Goddess Parvati
  रुद्र कुंड
  हे रुद्र कुंड आहे. महादेवाच्या विवाहात सहाभागी होणा-या सर्व देवी-देवतांनी या कुंडात स्नान केले होते. सरस्वती कुंडाला या सर्व कुंडांचे जल स्त्रोत मानले जाते.
 • Marriage Place Of Lord Shiv And Goddess Parvati
  मंदिर परिसरातील फोटो...
   
 • Marriage Place Of Lord Shiv And Goddess Parvati
  मंदिर परिसरातील फोटो...
 • Marriage Place Of Lord Shiv And Goddess Parvati
  मंदिर परिसरातील फोटो...

Trending