Home | Jeevan Mantra | Adhyatam | mehsh navami maheshwari samaj rituals news marathi

माहेश्वरी समाज आणि महेश नवमी काय आहे संबंध? वाचा रोचक माहिती

जीवनमंत्र डेस्क | Update - Jun 02, 2017, 02:26 PM IST

ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला 'महेश नवमी' (3 जून, शनिवार) साजरी केली जाते.

 • mehsh navami maheshwari samaj rituals news marathi
  ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला 'महेश नवमी' (3 जून, शनिवार) साजरी केली जाते. ही नवमी माहेश्वरी समाजाच्या उत्पत्तीचा दिवस आहे. माहेश्वरी समाजाची उत्पन्नही महादेवाच्या वरदान स्वरूपात झाल्याचे मानले जाते. महेश नवमी 'माहेश्वरी धर्म'वर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा प्रमुख सण आहे.

 • mehsh navami maheshwari samaj rituals news marathi
  ज्येष्ठ शुक्ल नवमीला 'महेश नवमी' किंवा 'महेश जयंती'चा उत्सव माहेश्वरी समाजात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा उत्सव महेश म्हणजेच शिव आणि देवी पार्वतीच्या उपासनेला समर्पित आहे. मेहश म्हणजे शंकर, जे त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यापैकी एक आहेत. मान्यतेनुसार ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील नवव्या दिवशी भगवान शंकराच्या कृपने माहेश्वरी समाजाची उत्पत्ती झाली होती.

  पुढे वाचा, कशाप्रकारे माहेश्वरी समाजाला प्राप्त झाली शिव कृपा...
 • mehsh navami maheshwari samaj rituals news marathi
  धर्म ग्रंथानुसार माहेश्वरी समाज प्राचीन काळी क्षत्रिय वंशी होता. शिकार करताना ऋषींनी दिलेल्या शापामुळे ग्रासित झाले होते, परंतु नवमीच्या दिवशी महादेवांनी यांना शापमुक्त करून न केवळ पूर्वजांचे रक्षण केले तर या समाजाला आपले नावही दिले. यामुळे या समुदाय माहेश्वरी नावाने प्रसिद्ध झाला. यामध्ये  मेहश म्हणजेच शंकर आणि वारी म्हणजे समुदाय किंवा वंश. महादेवाच्या आज्ञेनुसार या समाजाच्या पूर्वजांनी क्षत्रिय कर्म सोडून वैश्य किंवा व्यावसायिक कार्याचा अवलंब केला. यामुळे आजही माहेश्वरी समाज वैश्य किंवा व्यावसायिक समुदाय रूपात ओळखला जातो. 

Trending