Home | Jeevan Mantra | Adhyatam | Never Do These 4 Mistakes, God Never Forgive Them

या चुकांना माफ करत नाहीत देवता, भोगाव्या लागतात नरक यातना

जीवनमंत्र डेस्क | Update - Nov 22, 2017, 12:28 PM IST

नारदपुराण धर्म ग्रंथांमधील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. यामध्ये देवतांच्या विविध लीलांचे आणि ज्ञानाचे वर्णन आढळून येते.

 • Never Do These 4 Mistakes, God Never Forgive Them

  नारदपुराण धर्म ग्रंथांमधील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. यामध्ये देवतांच्या विविध लीलांचे आणि ज्ञानाचे वर्णन आढळून येते. नारदपुराणामध्ये मनुष्य जीवनाशी संबंधित विविध गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे. या गोष्टींकडे सर्वांनी लक्ष देणे आवश्यक आहे. नारदपुराणांमध्ये चार काम महापाप सांगण्यात आले आहेत. ही चार कामे केल्यास व्यक्तीला निश्चितपणे विविध दुःखांचा सामना करावा लागतो तसेच मृत्युनंतरही नरकात भोग भोगावे लागतात.


  नारदपुराणातील या गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • Never Do These 4 Mistakes, God Never Forgive Them

  गुरुपत्नीसोबत संबंध बनवणे
  गुरु मनुष्याला चांगल्या गोष्टींचे ज्ञान प्रदान करतो. गुरूला वडीलांसमान आणि गुरुपत्नीला आईसमान मानावे. गुरुपत्नीसोबत संबध बनवणार्‍या किंवा गुरुपत्नीकडे वाईट नजरेने पाहणार्‍या व्यक्तीला ब्रह्म हत्येपेक्षाही मोठे पाप लागते. गुरुपत्नीसोबत समागम करणार्‍या व्यक्तीच्या पापांचे प्रायश्चीत्य कोणत्याही प्रकारे शक्य नाही. अशा लोकांना जयंती नावाचा नरकात पापांची शिक्षा भोगावी लागते.

 • Never Do These 4 Mistakes, God Never Forgive Them

  चोरी करणे 
  जो मनुष्य दुसर्‍याची वस्तू बळकावण्याचा किंवा चोरण्याचा प्रयत्न करतो, तो महापापी मानला जातो. एखाद्याची वस्तू धोका देऊन किंवा चोरून प्राप्त केल्याने मनुष्याचे आयुष्यातील सर्व पुण्यकर्म नष्ट होते.चोरी केलेल्या वस्तूचा कधीही लाभ होत नाही, उलट त्या वस्तूमुळे नुकसानच जास्त होते. चोरी करणार्‍या व्यक्तीच्या कुटुंब आणि मित्रांनाही अडचणींना सामोरे जावे लागते. चोरी करणार्‍या व्यक्तीला आणि त्याला या कामामध्ये मदत करणार्‍या व्यक्तीलाही ताम्रीस नावाच्या नरकामध्ये दुःख भोगावे लागते. यामुळे मनुष्याने हे महापाप कधीही करू नये.

 • Never Do These 4 Mistakes, God Never Forgive Them

  मद्यप्राशन करणे (दारू पिणे)
  नारदपुराणामध्ये दारू पिण्याचे तीन प्रकार सांगण्यात आले आहेत - गौडी (गुळापासून तयार करण्यात आलेली) पैष्टी (तांदूळ, गहू इ. पिठांपासून तयार करण्यात आलेली) माध्वी (फुल, द्राक्ष इ रसापासून तयार करण्यात आलेली) स्त्री असो किंवा पुरुष सर्वांनी अशाप्रक्राच्या सर्व मद्यांपासून दूर रहावे. कोणत्याही प्रकारच्या दारूचे सेवन करणे महापापाचा भागीदार होण्यासारखे आहे. अशा लोकांवर देवता कधीही प्रसन्न होत नाहीत आणि या लोकांना नेहमी अडचणींना सामोरे जावे लागते. दारू पिणार्‍या आणि पाजणार्‍या व्यक्तीला विलेपक नावाचा नरकात यातना दिल्या जातात. यामुळे चुकूनही दारूला स्पर्शसुद्धा करू नये.

 • Never Do These 4 Mistakes, God Never Forgive Them

  ब्राह्मणाची हत्या 
  ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या मुखातून उत्पन्न झाले आहेत, पुराणांमध्ये ब्राह्मणांना सर्वात उच्च स्थान देण्यात आले आहे. ब्राह्मणांना पूजा करण्याच्या योग्यतेचे मानले गेले आहे. जर एखादा मनुष्य जाणीवपूर्वक किंवा नकळतपणे एखाद्या ब्राह्मणाची हत्या करत असेल तर त्याला ब्रह्म हत्येचे पाप लागते. हे महापाप मानले जाते. असे कर्म करणार्‍या व्यक्तीला आयुष्यभर दुःखाचा सामना करावा लागतो. केवळ ब्रह्म हत्या करणार्‍या व्यक्तीलाच नाही तर असे काम करण्यासाठी मदत करणार्‍या व्यक्तीलासुद्धा कुंभीपाक नावाच्या नरकात यातना दिल्या जातात. यामुळे मनुष्याने चुकूनही ब्रह्म हत्येचा भागी बनू नये.

Trending