आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धन नव्हे धर्म देऊ शकतो सुख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सगळ्यांनाच वरूनखाली बघण्याची संधी मिळत नाही. एखादी इमारत आणि डोंगरावरून खाली बघता येऊ शकते. परंतु विमानातून पृथ्वीकडे पाहण्याला खऱ्या अर्थाने वरून खाली बघणे म्हणता येईल. खालून वरून सगळेच पाहू शकतात. रात्रीच्या वेळी आकाशात पाहणे आणि त्याचवेळी चंद्रासोबत तारेही दिसू लागतात. या दृश्यातून कल्पना करा उज्जैनमध्ये सिंहस्थ मेळा सुरू झाला आहे. तेथे अनेकानेक तारे उतरल्याचे पाहायला मिळेल. त्यांना कधी साधू, कधी संत कधी संन्यासी असे संबोधले गेले आहे. एखादा साधक भेटेल. कोणी अभ्यासक भेटेल. अशा लोकांशी भेट होईल की त्यामुळे मनात संभ्रम निर्माण होईल किंवा तो दूर होईल. कोठे खूप पैसा गवसेल.

कोठे धनाचा अभाव दिसेल. जे दिसते ते पाहणे सोपे आहे. परंतु नजर येणाऱ्या गोष्टींकडेदेखील पाहता आले पाहिजे. त्यालाच अध्यात्म म्हटले जाते. काही असे लोक भेटू शकतात. ज्यांच्या आयुष्यातून काही गोष्टी गळून पडल्या आहेत. ज्या तुमच्याही आयुष्यातून निघून जाऊ शकतील. मेळ्यात साधूसंत पीडित मानवतेसाठी करुणा घेऊन आले आहेत. धनातून सुख मिळू शकत नाही. परंतु धर्म सुख देऊ शकतो. प्रदर्शनाच्या दृष्टीने पाहिल्यास तुमच्यावर टीका होईल. परंतु काही गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यास मात्र तुम्हाला धर्म शांती प्रदान करेल. बाहेरून गरमी आणि आतून गारवा. अशाप्रकारचा संयोग जीवनात क्वचितच अनुभवण्यास मिळतो. संधी मिळाल्यास संपूर्ण श्रद्धाभावनेतून उज्जैनला जा. तशी संधी मिळाली नाही तरी उज्जैनविषयी मिळाली माहिती, छायाचित्रे जरूर बघा. समजून घ्या. जीवनाशी जोडले जा. हिंदू धर्माचे हेच वैशिष्ट्य आहे. तो अनोख्या पद्धतीने विशेष गोष्ट माणसाच्या जीवनापर्यंत पोहोचवतो.
बातम्या आणखी आहेत...