आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच अशी निघाली एखाद्या खासदाराची अंत्ययात्रा, 525 KG साखरेत दिली समाधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहतक (हरियाणा) : येथील अस्थल बोहर भागातील बाबा मस्तनाथ मठाचे महंत आणि अलवरचे खासदार चांदनाथ शनिवारी रात्री निधन झाले. 61 वर्षीय महंत चांदनाथ यांना रविवारी नाथ संप्रदायाच्या विधीनुसार मठ परिसरात समाधी देण्यात आली. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रविवारी हजारो अनुयायांनी गर्दी केली होती. बाबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोक घरांच्या छतांवर, झाडांवर चढले होते. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर मान्यवरांनी पालखीला खांदा दिला.

शंखनाद आणि डमरूच्या निनादात सुरु झाली अंत्ययात्रा...
दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारदरम्यान शनिवारी रात्री 12 वाजता बाबा चांदनाथ यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांचे पार्थिव मस्तनाथ अस्थल बोहर मठामध्ये ठेवण्यात आले. गीता भवन येथे योगमुद्रेत बसलेल्या बाबांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून श्रद्धाळू आले होते.
- रविवारी सकाळी त्यांचे पैतृक गाव बेगमपूर येथील नागरिक, दिल्लीवरून त्यांचे लहान भाऊ रिटायर्ड सूभेदार मेजर उदयभान,  बहीण उषा आदी संपूर्ण कुटुंबीयांसोबत गीता भवन येथे आले होते. 
- सुंदर फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये महाप्रयाणावर निघालेले बाबा चांदनाथ यांना योगमुद्रेत आसनस्थ करून डमरू, शंखनादाच्या निनादात अंत्ययात्रा काढण्यात आली.
- गीता भवन येथून मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसह इतर लोकांनी पालखीला खांदा दिला.

या विधीनुसार देण्यात अाली समाधी...
- नाथ संप्रदायाच्या प्रथेनुसार पूजा-अर्चना करून विधीनुसार बाबा चांदनाथ यांना समाधी देण्यात आली.
- मोक्ष प्राप्तीसाठी नाथ प्रथेनुसार धूप, दीप, औषधी वनस्पती ठेवण्यात आल्या आणि शरीराच्या अंत्येष्टीसाठी सव्वा पाच किलो साखर टाकून त्यानंतर माती देण्याची प्रथा पूर्ण करण्यात आली.
- या दरम्यान बाबांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी शेकडो लोक आले होते.

पुढील स्लाईड्सवर पाहा, समाधी विधी आणि अंत्ययात्रेचे खास फोटो...
बातम्या आणखी आहेत...