Home | Jeevan Mantra | Adhyatam | ramcharit manas granth tips for life

हे 6 जण करू शकतात तुमचे मोठे नुकसान, यांना समजू नका कमजोर

जीवनमंत्र डेस्क | Update - Oct 30, 2017, 02:44 PM IST

श्रीरामचरितमानस ग्रंथामध्ये जीवन व्यवस्थापनाशी निगडीत अनेक सूत्र दडलेले आहेत. या पवित्र ग्रंथाची रचना गोस्वामी तुलसीदास

 • ramcharit manas granth tips for life
  श्रीरामचरितमानस ग्रंथामध्ये जीवन व्यवस्थापनाशी निगडीत अनेक सूत्र दडलेले आहेत. या पवित्र ग्रंथाची रचना गोस्वामी तुलसीदास यांनी केली आहे. यांनी दोह्यांच्या माध्यमातून लाईफ मॅनेजमेंटशी संबधित अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या वर्तमान काळातही लागू होतात. श्रीरामचरितमानसच्या आरण्यकांडात जेव्हा लक्ष्मण शूर्पणखाचे नाक, कान कापतात तेव्हा ती रावणाकडे जाते आणि सांगते की, कोणत्या सहा गोष्टींना लहान म्हणजे क्षुल्लक समजू नये. आज आम्ही तुम्हला याच सहा गोष्टींबद्दल सांगत आहोत...

  रिपु रुज पावक पाप प्रभु अहि गनिअ न छोट करि।
  अस कहि बिबिध बिलाप करि लागी रोदन करन।।

  अर्थ- शत्रू, रोग, अग्नी, पाप, स्वामी आणि सर्प यांना कधीही लहान समजू नये. हे सांगून शूर्पणखा विविध प्रकारे विलाप करत रडू लागली.

  शत्रू -
  शत्रू आपल्यापेक्षा कितीही लहान असला तरी त्याच्यापासून सावध राहावे. कारण अनेकदा छोटे शत्रू असे काही काम करून जातात की, नंतर पश्चाताप करावा लागतो. जर छोटे-छोटे शत्रू राजे एकत्रित होऊन चक्रवर्ती राजावर चालून गेले तर त्या राजाचा पराभव होऊ शकतो. यामुळे शत्रूला कधीही लहान आणि कमकुवत समजू नये.

  इतर कोणत्या पाच गोष्टीना क्षुल्लक समजू नये हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..

 • ramcharit manas granth tips for life
  रोग -
  छोट्या-छोट्या रोगांकडेही दुर्लक्ष करू नये. सर्दी, ताप, खोकला इ. रोग भलेही साधारण वाटत असले तरी जेव्हा हे वाढतात तेव्हा शरीराला पोकळ करतात. अनेकदा हे छोटे रोग गंभीर आजारामध्ये परिवर्तित होतात. या छोट्या वाटणाऱ्या रोगामुळे मनुष्याला मृत्यूला सामोरे जावे लागते. त्यामुळे या छोट्या रोगांवर त्वरित उपचार करावेत.
 • ramcharit manas granth tips for life
  अग्नी -
  अग्नीमध्ये एवढी शक्ती असते की, थोड्याच वेळात मोठ्यातील मोठे जंगल राख होऊ शकते. अग्नीचे सर्वात छोटे रूप एक ठिणगी असते. परंतु जेव्हा ही ठिणगी विक्राळ रूप धारण करते तेव्हा यावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसते. यामुळे आगीसोबत कधी खेळू नये.
 • ramcharit manas granth tips for life
  पाप -
  धर्म ग्रंथानुसार मनुष्याला त्याने केलेल्या कामाच्या आधारे पाप-पुण्य प्राप्त होते. अनेकवेळा मनुष्य छोटे-छोटे चुकीचे काम करतात. या कामांमुळे प्राप्त होणारे पापही कमीच असते, परंतु जेव्हा या छोट्या-छोट्या पाप कर्मांचे फळ एकत्रित होते, तेव्हा याची कठोर शिक्षा भोगावी लागते. यामुळे पाप कर्म भलेही छोटे असो, यापासून दूर राहावे.
 • ramcharit manas granth tips for life
  स्वामी -
  मालकाला कधीही छोटे समजू नये. कारण मालक नाराज झाले तर तुमचे मोठे नुकसान करू शकतात. जर तुम्ही सेवक असाल आणि मालकाला घाबरवून-धमकावून अधिकार गाजवण्याच्या प्रयत्नात असाल तर ही सर्वात मोठी चूक आहे. मालकाला जेव्हाही संधी मिळेल तेव्हा तो तुमचे नुकसान करू शकतो. यामुळे मालकाला कधीही छोटे समजू नये.
 • ramcharit manas granth tips for life
  साप -
  साप दिसायला कितीही छोटा का असेना परंतु जर त्यांचे दंश केला तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. यामुळे सापाला कधीही लहान (कमजोर) समजू नये.

Trending