आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीचे संत कवी जनीजनार्दन समाधीस्थळी 417 वर्षांपासून साजरा होत आहे चातुर्मास उत्सव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड : मराठी संत परंपरेतील प्रसिध्द संत जनीजनार्दन यांचे समाधीस्थान असलेल्या बीड शहरातील थोरल्या पाटांगणावर मागील ४१७ वर्षापासुन साजरा होणारा चातुर्मास समाप्ती वार्षीक उत्सव आता बीडकरांचा झाला असुन हा उत्सव धार्मिक सलोखा वाढत आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर यांच्या संजीवन समाधी सोहळ्यांनतर अखंड परंपरा असलेला हा उत्सव नावारूपास येत आहे.  

मराठीच्या संतपरंपरेतील जनीजनार्दन हे संत कवी बीडचे असुन  विजापुरच्या आदीलशहाकडे पंतप्रधान म्हणून त्यांनी काही काळ  काम पाहीले. आदीलशहाच्या दरबारात  त्यांना उशीर होत असल्याने त्या काळातील स्थानिक लोकांनी  राजाकडे त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण केला. पुढे आदीलशहाने १६०० मध्ये जनीजनार्दन यांना  हत्तीच्या पायाखाली देण्याचे आदेश सैनिकांना दिले. तेंव्हा आश्यर्च असे घडले की, हत्तीने जनीजनार्दन यांना डोक्यावर घेतल्याचे पाहुन राजाला पश्चाताप झाला. राजाने जनीजनार्धन यांना पुन्हा पुन्हा वजीर व्हा असे सांगुन सेवेची संधीही दिली होती.  पंरतु जनीजनार्दन यांनी आता माझ्या वैराग्याला तुम्ही निमित्त झाला आहात असे सांगुन राजाकडे त्यागपत्र देत नौकरी सोडली. विजापुरला असतांना जनीजनार्दन यांनी दुष्काळात धान्याची कोठारे गरिबांसाठी खुली  केली होती.  

विजापुर सोडल्यांनतर ते बीडच्या शहनशाहवली दर्ग्यात काही दिवस राहीले. पुढे बीडचे एल.आर.देशमुख, माजी आमदार सिराज देशमुख यांच्या पूर्वजांनी सध्याच्या पाटांगण संस्थानच्या ठिकाणी  त्यांना जागा दिली. पुढे पंढरपुरला गेल्यानंतर जनीजनार्धन यांना पांडूरंगाने दृष्टांत देवुन गंगामसला येथील मोरेश्वर गणपतीच्या क्षेत्री जावुन सेवा करण्याचा दृष्टांत दिला  तिथे गणपतीने सगुण रूपात त्यांना दर्शन दिले. त्या ठिकाणी मिळालेली गणपतीची एक मुर्ती बीडच्या थाेरले पाटांगण येथे आजही पुजेत असुन येथे  जनीजनार्दन यांची प्रतिकात्मक समाधी, टोपी व गोधडी येथे पहावयास मिळते. जनी जनार्दन  यांची वेदांतपर , रामकृष्ण चरित्रपर अशी रचना असुन हिंदीत भक्तीपर पदे गायीली आहेत.  

निर्विकल्प हा ग्रंथ त्यांनी एकाच दिवसात पूर्ण केला. यांच्या देहावसानानंतर येथे महादेव गोसावी, मारोती गोसावी, देवीदास बुवा पाटांणावर आणि आता धुंडीराज शास्त्री पाटांगणकर हे  मागील ४१७ वर्षापासुन  चातुर्मास समाप्ती उत्सव साजरा करत आहेत. दहा दिवसाच्या या उत्सवात चतुर्वेद पारायण,चार महिने  भिक्षाने  अन्न सेवन केले जाते. टोपी, छत्री, चप्पल,अपरीगृह , शिवलेले वस्त्र याचा त्याग  मठाधिपती वेदशास्त्र संपन्न धुंडीराज शास्त्री करतात.  दररोज जनीजनार्दन यांच्या पादुकास अभिषेक करण्यात येतो. या उत्सवाला श्रृंगेरी पिठाचे महास्वामी शंकराचार्य, भारतातील सर्वश्रेष्ठ विद्वान विष्णूनाथ वामनदेव, जगदगुरू शंकराचार्य जग्गनाथपुरी, पंडीत जसराज यांनी  भेटी दिल्याने उत्सवाची महती लक्षात येते. 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या संदर्भातील इतर खास माहिती...
बातम्या आणखी आहेत...