Home | Jeevan Mantra | Adhyatam | vat purnima 2017 do Vatsavitri Fast By This Method

आज या विधीनुसार करा वटसावित्री व्रत, अखंड राहील सौभाग्य

जीवनमंत्र डेस्क | Update - Jun 08, 2017, 07:55 AM IST

हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते.

 • vat purnima 2017 do Vatsavitri Fast By This Method
  हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. भारतखंडातील स्त्रिया वडाची पूजा करतात. यामागे भाव असतो तो जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा. या वर्षी हे व्रत 8 जून गुरुवारी आहे.

  पूजा साहित्य:-
  2 हिरव्या बांगड्या, शेंदुर, एक गळसरी, अत्तर, कापुर, पंचामृत, पुजेचे वस्त्र , विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गुळ खोबरयाचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहु, सती देवीचा फोटो किंवा सुपारी इ.

  पूजन विधी:-
  वडाच्या झाडाला किंवा वटपौर्णिमाच्या कागदाला ( वटपौर्णिमेचा कागद बाजारात मिळतो) तिहेरी दोरा बांधावा. सूत कापसाचे काढलेले असावे. प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी. त्याची हळद कुकुं अक्षता वाहुन पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर सती मातेच्या सुपारीचीपण पंचोपचार पूजन करावे. वडाच्या मूळाजवळ पुरुष सुक्तासह षोडशोपचार अभिषेक करून चोपचार पूजन व् आरती करावी.

  सूत गुंडाळताना या मंत्राचा उच्चार करावा.
  अवैधव्यं च सौभाग्यं देहि त्वं मम सुव्रते।
  पुत्रान् पौत्रांश्च सौख्यं च गृहाणाध्र्यं नमोस्तुते।।

  वटवृक्षाला पाणी अर्पण करताना या मंत्राचा उच्चार करावा...
  वट सिंचामि ते मूलं सलिलैरमृतोपमै:।
  यथा शाखाप्रशाखाभिर्वृद्धोसि त्वं महीतले।
  तथा पुत्रैश्च पौत्रैस्च सम्पन्नं कुरु मां सदा।।

  खालील मंत्र म्हणून वडास नमस्कार करावा.
  सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।
  तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।
  अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।
  अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।"

  स्रियांनी या दिवशी उपवास करावा दुसऱ्या दिवशी सकाळी 10 नंतर सोडावा. वडास हल्दी कूकु वाहून आंबे पैसे वडापुढे ठेऊन नमस्कार करावा. वडाला तिन प्रदक्षिणा घालाव्यात. पाच सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी.

  वटपौर्णिमेचे व्रत सुरू होण्यामागील कथा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • vat purnima 2017 do Vatsavitri Fast By This Method
  वटपौर्णिमेचे व्रत सुरू होण्यामागील पूर्वपीठिका
  यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरुवात केली.

Trending