Home | Jeevan Mantra | Adhyatam | vat purnima measures for womans marathi news

वटपौर्णिमा : घरातील मुख्य स्त्रीने सकाळी करावा हा उपाय, प्राप्त होईल सुख-समृद्धी

जीवनमंत्र डेस्क | Update - Jun 07, 2017, 01:01 PM IST

ज्येष्ठ शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथिला वटपौर्णिमा (8 जून, गुरुवार) सण साजरा केला जातो.

 • vat purnima measures for womans marathi news

  ज्येष्ठ शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथिला वटपौर्णिमा (8 जून, गुरुवार) सण साजरा केला जातो. महिलांच्या आयुष्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वटपौर्णिमा सणानिमित्त लक्ष्मी कृपा प्राप्तीचा एक खास उपाय सांगत आहोत.
  शास्त्रानुसार महालक्ष्मीच्या कृपेशिवाय पैशाशी संबंधित कोणतेही काम योग्य पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही. ज्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा राहते, त्यांना जीवनात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. शास्त्रामध्ये लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचे विविध उपाय सांगण्यात आले आहेत. त्यामधीलच एक उपाय येथे सांगण्यात येत असून, हा उपाय पौर्णिमेपासून स्त्रियांनी सुरु करून नियमितपणे केल्यास घरात सुख-समृद्धी राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, उपाय...

 • vat purnima measures for womans marathi news
  उपाय -
  उपाय करण्यासाठी घरातील प्रमुख महिलेने दररोज सकाळी लवकर झोपेतून उठून घराच्या मुख्य दारासमोर तांब्याच्या कलशाने पाणी शिंपडावे (सडा टाकावा). हा छोटा उपाय आहे, परंतु घरातील नकारात्मकता यामुळे दूर होते. ज्या घरांमध्ये हा उपाय केला जातो, त्या घरावर देवी-देवतांची कृपा राहते.

  पुढे जाणून घ्या, तांब्याचा कलश का...
 • vat purnima measures for womans marathi news
  तांब्याचा कलश का...
  सर्व प्रकारच्या पूजन कर्मामध्ये तांब्याच्या कलशाची अनिवार्यता सांगण्यात आली आहे. तांब धातूला पवित्र मानण्यात आले आहे. तसेच तांब्याच्या कलशात ठेवलेले पाणी औषधीय गुणयुक्त होते. या कलशातील पाण्याने दारासमोर सडा टाकल्यास घराजवळील आरोग्यास हानिकारक असलेले सूक्ष्म किटाणू नष्ट होतात. तांब्याच्या कलशातील पाणी प्यायल्यास त्वचासंबंधी रोगांचा नाश होतो.
 • vat purnima measures for womans marathi news
  प्राचीन मान्यतेनुसार प्रातःकाळी महालक्ष्मी पृथ्वी भ्रमण करते. या दरम्यान ज्या घरांमध्ये स्वच्छता आणि पवित्रता असते, त्या घरात लक्ष्मी वास करते. तांब्याच्या कलशाने घरासमोर पाणी शिंपडल्यास आणि स्वच्छता केल्यास घराजवळील वातावरण पवित्र होते. नकारत्मक उर्जा नष्ट होते.
 • vat purnima measures for womans marathi news
  जेव्हा घरातील वातावरण पवित्र होते तेव्हा सर्व देवी-देवतांची कृपा आपल्या घरावर राहते. तसेच घरामध्ये सुख-समृद्धी, धनाचा वास राहतो. त्यामुळे हा उपाय सुख-समृद्धीला शक्ती प्रदान करणारा आणि सकारात्मक उर्जा निर्माण करणारा मानला गेला आहे.

Trending