लक्ष्मीला अत्यंत प्रिय / लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ही 1 वस्तू, यामुळे घरात येते धन आणि समृद्धी

Jun 06,2017 07:51:00 AM IST
महामेरू श्री यंत्र महालक्ष्मी पराविद्याचे साक्षात स्वरूप आहे. 8 जून गुरुवारी पौर्णिमा तिथी असून या दिवशी महिला वटपौर्णिमेच्या सण साजरा करतात. या शुभ मुहूर्तावर याची स्थापना केल्यास सैभाग्याचे दरवाजे खुले होतात. याची अधिष्ठात्री देवी श्री ललिता आहे. मान्यतेनुसार, जेव्हा सृष्टीमध्ये काहीच नव्हते तेव्हा देवी श्री विद्येच्या विचारातून एक मेरू उत्पन्न झाला. तोच मेरू 'श्री यंत्र; रूपात प्रसिद्ध झाला. यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश सहित सर्व देवी-देवतांचा निवास आहे. याची पूजा केल्यास सर्व सुख प्राप्त होतात. याची घरात स्थापना केल्यास लाभ होईल.

कशी आहे बनावट
ज्याप्रमाणे मंत्राची शक्ती त्याच्या शब्दामध्ये असते. ठीक त्याचप्रमाणे यंत्राची शक्ती त्याच्या रेषा आणि बिंदूंमध्ये असते. श्री यंत्रामध्ये 9 त्रिकोण म्हणजे त्रिभुज असतात. हे निराकार शिवच्या 9 मूळचे संकेत आहेत. 9 मिळून 45 नवीन त्रिभुज बनतात, जे 45 देवतांचे प्रतिनिधित्व करतात. मध्यभागी सर्वात छोट्या त्रिभुजवर एक बिंदू असतो. जो समाधीचा सूचक आहे. हे शिव-शक्तीचे संयुक्त रूप आहे. एकूण 9 चक्र 9 अधिष्ठात्री देवींचे प्रतीक आहेत.

पुढे वाचा, श्री यंत्र का मानले जाते खास...
मनुष्य शरीराशी समानता आपले शरीरसुद्धा मेरूच्या आकाराचे आहे. जेव्हा आपण याची पूजा करतो तेव्हा आपल्या शरीराच्या पाचही तत्वांचे शोधन होते. मेरू घेताना तो आतून भरीव नसून पोकळ असावा. याच्या आतील भाग आपल्या शरीरातील रिकामी जागा दर्शवत असतो. या स्थानामध्ये सकारात्मक ऊर्जा एकत्रित होते.श्री यंत्राचे प्रकार पारद श्री यंत्र -सिद्धी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी ठेवले जाते. मेरु पृष्ठ अष्टधातु -कुटुंब, सुख आणि धन प्राप्तीसाठी. स्फटिक श्री यंत्र - शांती, विद्या आणि समृद्धीसाठी. स्वर्ण यंत्र - व्यवसायासाठी. पिरॅमिड श्री यंत्र-धन, ध्यान आणि आरोग्यासाठी. तांब्याचे श्री यंत्र -धन आणि समृद्धी रजत पत्र - धन, सुख आणि दानासाठी.कसे ठेवावे एक लाल कपड्यावर महामेरू ठेवावा. त्याच्या एक बाजूला पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यावर श्रीं म्हणजे लक्ष्मी बीज मंत्राचा उच्चार करत अंगठा, रिंग फिंगर आणि मधल्या बोटाने कुंकू अर्पण करावे. अशाप्रकारे 11 दिवस याचा अभिषेक करावा. त्यांनंतर हे धन स्थानावर ठेवावे. घरातील धन कधीही संपणार नाही.हे यंत्र ठेवण्याचे फायदे - श्री यंत्राची पूजा केल्याने रोगांचा नाश होतो. - अपार धन, समृद्धी, यश आणि कीर्ती मिळते. - अडकलेले काम पूर्ण होते. - व्यापारातील अडचणी दूर होतात. - एकाग्रता वाढते. - आजार दूर होतात.
X