Home | Jeevan Mantra | Adhyatam | woman always stay away from these six things

आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या या 6 गोष्टींपासून स्त्रियांनी नेहमी राहावे दूर

दिव्यमराठी वेब टीम | Update - Jun 28, 2017, 07:42 AM IST

हिंदू धर्मामध्ये मनुस्मृती ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. या ग्रंथामध्ये जीवन सुखी करणारे विविध सूत्र सांगण्यात आले आहेत.

 • woman always stay away from these six things
  हिंदू धर्मामध्ये मनुस्मृती ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. या ग्रंथामध्ये जीवन सुखी करणारे विविध सूत्र सांगण्यात आले आहेत. या ग्रंथाची रचना महाराज मनु यांनी महर्षी भृगु यांच्या सहकार्याने केली होती, अशी मान्यता आहे. या ग्रंथामध्ये लाइफ मॅनेजमेंटशी संबंधित विविध सांगण्यात आलेले विविध सूत्र आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. त्या नियमानुसार स्त्रियांनी सहा कामांपासून नेहमी दूर राहावे. ती 6 कामे खालीलप्रमाणे आहेत.

  श्लोक
  पानं दुर्जनसंसर्गः पत्या च विरहोटनम्।
  स्वप्नोन्यगेहेवासश्च नारीणां दूषणानि षट्।।

  या श्लोकामध्ये सहा कामे महिलांसाठी वर्ज्य सांगण्यात आली आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या सहा कामांपासून महिलांनी दूर राहावे..

 • woman always stay away from these six things
  सुरापान (दारू पिणे)
  हिंदू धर्मामध्ये महिलांचा मुख्य दागिना लाज, मर्यादा मानण्यात आला आहे. स्त्रियांसाठी एक मर्यादा ठरवण्यात आली आहे. जेव्हा एखादी महिला स्वतःची मर्यादा ओलांडते तेव्हा तिला अपयशाचा सामना करावा लागतो. मद्यप्राशन म्हणजे दारू प्यायल्याने स्त्रीला चांगल्या-वाईट गोष्टीचे भान राहत नाही आणि कधीकधी ती मर्यादाहीन आचरण करून बसते. दारू पिणार्‍या महिलांना समाजातही योग्य स्थान मिळत नाही. अशा महिलांना कुटुंबातही अपमानास्पद वागणूक मिळते. त्यामुळे दारू पिणे केवळ व्यक्तीसाठी नाही तर समाजासाठीसुद्धा हानिकारक आहे.
   
 • woman always stay away from these six things
  दृष्ट किंवा दुर्जन व्यक्तीची सोबत -
  मनुस्मृतीनुसार स्त्रीने दुष्ट पुरुषासोबत जवळीकता वाढवू नये. एखादा व्यक्ती वाईट विचार किंवा कामाशी जोडला गेलेला असेल, अपराधी किंवा संवेदनाहीन असेल, त्याच्या जीवनात दया किंवा परोपकाराला कोणतेही स्थान नसेल अशा व्यक्तीच्या संगतीमध्ये राहून स्त्री वाईट आचरण व सवयींची गुलाम होते. यामुळे शेवटी तिला असुरक्षा, अपयश, अपमानाला सामोरे जावे लागते.
 • woman always stay away from these six things
  पतीपासून वेगळे राहणे -
  मनुस्मृतीनुसार लहानपणी स्त्रीचे रक्षण वडील करतात आणि तारुण्यात पती. वृद्धावस्थेत तिचे रक्षण मुलगा करतो. अशाप्रकारे लग्नानंतर स्त्रीने पतीसोबतच राहावे. पती आजारी किंवा संकटात असल्यास पतीला सोडून कुठेही जाऊ नये. पत्नी धर्माचे पालन करून प्रत्येक अवघड परिस्थितीचा एकजुटीने सामना करावा. पतीपासून दूर राहणार्‍या स्त्रीला समाजात विविध अडचणींना सामोरे जावे लागते. घर-कुटुंबात आणि समजात योग्य मान-सन्मान मिळवण्यासाठी स्त्रीने जोडीदारसोबतच राहणे आवश्यक आहे. पतीसोबत स्त्री अधिक सशक्त आणि सुरक्षित राहते.
 • woman always stay away from these six things
  व्यर्थ फिरणे -
  ज्या स्त्रिया विनाकारण इकडे-तिकडे फिरत राहतात, त्या स्वच्छंदी असतात, म्हणजेच अशा स्त्रिया कोणाचे ऐकतही नाहीत तसेच सामाजिक आणि कौटुंबिक बंधनातही राहत नाहीत. यामुळे त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे स्त्रियांनी काम नसेल तर व्यर्थ घराबाहेर पडू नये. वारंवार कारण नसताना फिरणे योग्य नाही. जर एखादी विवाहित स्त्री असे करत असेल तर दोन्ही कुळांच्या मान-सन्मानामध्ये कमतरता येऊ शकते.
 • woman always stay away from these six things
  दररोज चुकीच्या वेळेला झोपणे -
  स्त्रियांनी अवेळी आणि उशिरापर्यंत झोपल्याने घरात कलहाची स्थिती निर्माण होते. उशिरापर्यंत झोपल्यामुळे स्त्री घरातील कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करू शकत नाही आणि अवेळी झोपल्यामुळे कुटुंबातील लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होऊ लागतो. याचा प्रभाव दाम्पत्य जीवनावरही पडतो. अवेळी आणि उशिरापर्यंत झोपणार्‍या स्त्रियांना शारीरिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. उदा. आळस, लठ्ठपणा इ. याचा प्रभाव दिनचर्येवर पडू शकतो. यामुळे स्त्रियांनी दररोज अवेळी आणि उशिरापर्यंत झोपू नये.
 • woman always stay away from these six things
  दुसर्‍यांचा घरात राहणे -
  वडिलांच्या घरानंतर पतीचे घरच स्त्रीसाठी उपयुक्त राहते. भलेही पतीच्या घरामध्ये कितीही कमतरता असल्या तरी त्याच घरामध्ये नियमपूर्वक राहणे पत्नीचा धर्म आहे. पतीपेक्षा इतर नातेवाईकाचे घर अधिक सुविधासंपन्न असू शकते, परंतु त्या घरात जास्त जाऊन जास्त काळ राहणे स्त्रियांसाठी योग्य नाही. अनेकवेळा पत्नी आपल्या पाटीवर रागावून इतर ठिकाणी राहण्यासाठी जाते. अशा स्थितीमध्ये जास्त काळ आपल्या घरापासून इतर ठिकाणी राहणे योग्य नाही. ज्या स्त्रिया पतीपासून विभक्त राहतात, त्यांच्याकडे चुकीची मानसिकता असलेले लोक वाईट दृष्टीने पाहतात. पतीसोबत राहणार्‍या स्त्रीला संरक्षण तसेच योग्य मान-सन्मान मिळतो.

Trending