आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा असतो गर्भधारणा ते बाळाच्‍या जन्‍मापर्यंतचा प्रवास, संपूर्ण माहितीसह पाहा Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्भधारणा ते बाळाच्‍या जन्‍मापर्यंतचा प्रवास कसा असतो ? या काळात गर्भाची वाढ कशी होते ? याची खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी....
 
कशी होते गर्भधारणा?
> आपल्या शरीरातील सर्व पेशींमध्ये 46 गुणसूत्रे असतात.
> त्यापैकी 44 गुणसूत्रांमुळे आपली शारीरिक, वैचारिक व मानसिक लक्षणे उरतात.
> स्त्रियांमध्ये 44 व्यतिरिक्तही दोन ‘X’ क्रोमोसोम्स’ असतात, तर पुरुषांमध्ये, XY’’स्त्रियांच्या अंडकोषात मात्र असंख्य बीजांडे जन्मापासूनच सुप्तावस्थेत असतात.
> या बीजांडांमध्ये मात्र 23 म्हणजे (22 + ‘X’ ) ही गुणसूत्रे असतात.
> पुरुषांच्या अंडकोषात अनेक शुक्रजंतू असतात आणि त्या शुक्रजंतूंमध्ये (22 + ‘Y’) ही गुणसूत्रे असतात.
> मासिक पाळी सुरू झाल्यानंतर साधारण 14 व्या दिवशी स्त्रीच्या अंडकोषातून एक बीजांड बाहेर पडते.
> बीजनलिकेच्या टोकाशी असलेल्या बोटांच्या अकाराच्या ‘फ्रिंब्रियां’मुळे हे स्त्रीबीज बीजनलिकेमध्ये शिरते.
> या बीजामध्ये फलित होण्याची क्षमता साधारणत: 24 तासांपर्यंत असते.
> या कालावधीत जर शुक्रजंतू उपलब्ध झाले तर गर्भधारणा होण्याचा संभव असतो.
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, गर्भाच्‍या वाढीचे फोटोज आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर VIDEO....
बातम्या आणखी आहेत...