आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • आंब्याचा असा आहे शक्तिवर्धक उपाय, फळांच्या राजाचे हे आहे आयुर्वेदिक महत्त्व Benefits Of Mango Fruit To Enhance Sexual Power For Married Couple

आंब्याचा असा आहे शक्तिवर्धक उपाय, फळांच्या राजाचे हे आहे आयुर्वेदिक महत्त्व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क - विशिष्ट हवामानानुसार आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक फळे आणि वनस्पती निर्माण करून निसर्गाने माणसावर अनंत उपकार केले आहेत.

खासकरून उन्हाळ्यात येणारे फळ म्हणजे आंबा. आंब्याच्या विशिष्ट चवीमुळे फळांचा राजाच म्हणतात. मंगलकार्य, सण, उत्सव, देवपूजा आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने आंब्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आंब्याचे झाड सर्वसाधारणपणे 6 ते 15 मीटर उंच असते. कधी कधी २० ते ३० मीटर उंचही वाढतो. झाड डेरेदार आणि भरपूर सावली देणारे असते. आम्रावृक्षाचा उल्लेख पुराणात आणि प्राचीन साहित्यात बऱ्याच ठिकाणी आढळतो. या झाडाला प्रजापतीचे रूप मानतात. आम्रमंजिरी ( मोहोर) हि कामदेवाच्या पाच बाणातील एक बाण आहे असे मानतात. महाकवी कालिदासाच्या साहित्यात मनाला प्रसन्नता देणाऱ्या आमराईचे आणि कोकीळ कुजनाचे वर्णन आढळते. वेदकाळापासून आंब्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आंब्याचे असे आहेत आयुर्वेदिक गुण...

 

शक्तिवर्धक/ वीर्यवर्धक
आंब्याचा रसात दूध मिसळून प्यायल्याने वीर्याची दुर्बलता नष्ट होते. रोज 2-3 पिकलेले आंबे खाऊन नंतर वरून एक ग्लास दूध प्यायल्याने वीर्य वृद्धी होते. शुक्राणु पुष्ट होतात. दोन महिने सातत्य ठेवून संध्याकाळच्या वेळी एक आमरसात एक कप दूध मिसळून प्यायल्याने शारीरिक कमजोरी दूर होते.
आयुर्वेदानुसार, या प्रयोगाने रक्त स्वच्छ होते. पुरुषांची ताकद वाढते शिवाय जोडप्याच्या लैंगिक समस्याही दूर होण्यास मदत होते. शीघ्रपतन ठीक होते. पिकलेल्या आंब्याच्या रसामध्ये खडीसाखर, विलायची, लवंग वा अद्रक स्वादानुसार मिसळून प्यायल्याने शुक्राणूंच्या संख्येत वाढ होते. मूत्रविसर्जनही मोकळे होते. स्फूर्ति/चैतन्यात वाढ होते. नियमित सेवनाने हडकुळी व्यक्तीही धष्टपुष्ट होते.


कॅन्सरपासून बचाव
आंब्यातील अँटिऑक्सीडंट कोलोन कॅन्सर, ल्यूकेमिया आणि प्रोस्टेट कॅन्सरपासून बचावासाठी फायदेशीर आहे. यात क्यूर्सेटिन, एस्ट्रागालिन आणि फिसेटिन यासारखे अनेक तत्त्व असतात. जे कॅन्सरपासून बचावासाठी उपयुक्त ठरतात.

 

डोळ्यांसाठी उपयुक्त
आंब्यात व्हिटॅमिन ए भरपूर असतो. हे सत्व डोळ्यांसाठी वरदान आहे.

कोलेस्ट्रॉल नियमित राखतो
आंब्यात फायबर आणि व्हिटॅमिन सी असतात. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉलचे संतुलन राखण्यात मदत होते.

 

त्वचेसाठी उपयुक्त
आंब्याच्या चोथ्याचा फेसपॅक तयार करून तो लावल्यास चेहऱ्यावर तजेला येतो, त्वचा उजळते.

पाचनक्रिया ठीक राखतो
आंब्यात असे अनेक एन्झाइन्म्स आहेत जे प्रोटीन तोडण्याचे काम करतात. यामुळे भोजन लवकरच पचते. सोबतच यात साइर्टिक अॅसिड, टरटैरिक अॅसिड शरीरातील क्षारतत्त्वांचे संतुलन राखते. 

 

स्थूलत्व कमी होते
स्थूलत्व कमी करण्यासाठी आंब्याचे सेवन फायदेशीर आहे. आंब्यातील फायबर शरीराच्या अतिरिक्त चरबीसाठी खूप फायदेशीर ठरते. आंबा खाल्ल्यानंतर भूक कमी लागते, यामुळे ओव्हर इटिंगचा धोकाही कमी होतो. 

 

रोगप्रतिकारक क्षमता वाढते
आंबा खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होते.

 

स्मरणशक्ती
ज्यांना विसरभोळेपणा आहे, त्यांनी आंब्याचे सेवन केले पाहिजे. यात आढळणारे ग्लुटामिन अॅसिड स्मरणशक्ति वाढवण्यासाठी उत्प्रेरकाचे काम करते. सोबतच यामुळे रक्त कोशिकाही सक्रिय होतात. यामुळे गर्भवतींना आंबा खाण्याचा सल्ला दिला जातो.

 

उष्णतेपासून बचाव
उन्हाळ्यात दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना एक ग्लास कैरीचे पन्हे पिऊन पडावे. यामुळे तुमचा उष्माघातापासून बचाव होतो. कैरीचे पन्हे शरीरात पाण्याचे संतुलन कायम ठेवण्यासाठी मदत करते. उन्हाळ्याच्या दिवसांत हे सर्वोत्तम पेय मानले जाते.  

 

बातम्या आणखी आहेत...