आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅलेंन्स डायट म्हणजे काय? यासाठी जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क: डायटीशियन आणि फिजिशियन नेहमीच बॅलेंन्स डायट घेण्याचा सल्ला देतात. परंतू अनेक लोकांना याचा अर्थ माहिती नसतो. डायटीशियन शीला सेहरावत डायटसंबंधीत अशाच काही प्रश्नांची उत्तर देत आहेत.


प्रश्न - बॅलेंन्स डायट काय आहे? यासाठी डायटमध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करावा लागतो?
उत्तर -
ज्या जेवणामध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटीन, कार्ब, फायबर संतुलित प्रमाणात असते त्याला बॅलेन्स डायट म्हणतात. सॅच्यूरेटेड फॅट, ट्रान्स फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते, हे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढवते आणि निरोगी आहाराच्या श्रेणीत बसत नाही. जर तुम्हाला हाडे मजबूत ठेवायची असतील तर अल्कोहलपासून दूर राहा. शरीराला जर पुरेसे कॅल्शियम मिळाले नाही तर ते हाडांमधून कॅल्शियम घेण्यास सुरुवात करते. यामुळे हाडे बारीक होतात. आपल्या रोजच्या जेवणात दूध, हिरव्या भाज्या, ताज्या फळांचा समावेश करा. फास्ट फूडपासून दूर राहा.

 

 


प्रश्न - मी व्यायाम करत नाही, शरीरात ऊर्जेचे प्रमाण टिकून राहण्यासाठी कोणता आहार घेऊ? - कुणाल मिश्रा, इंदौर
उत्तर -
शरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठी प्रोटीन सर्वात जास्त गरजेचे असते. यासाठी दिवसाची सुरुवात अंकुरित धान्याने करा. अंकुरित डाळींमध्ये क्षारीय तत्त्व असते. जे तणाव दूर करते आणि अम्ल विकारांपासून शरीराचे रक्षण करतात. अंकुरित धान्यात प्रोटीनसोबतच कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन आणि खनिज असतात. हे पचनासाठी आवश्यक असते. हे दोन्हीही तत्त्व शरीरात ऊर्जेचा स्तर टिकवून ठेवतात. यासोबतच 8 ते 12 ल्गास पाणी अवश्य प्यावे. यामुळे शरीरात पाण्यात प्रमाण संतुलित राहते आणि डिहायड्रेशनची समस्या होत नाही. 

बातम्या आणखी आहेत...