Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Effective Tips To Remove Hair From Face

Beauty Tips: चेह-यावरील नको असलेले केस या घरगुती उपायांनी करा दूर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 23, 2018, 12:00 AM IST

अनेक मुली आणि महिला चेह-यावरील नको असलेल्या केसांमुळे त्रस्त असतात.

 • Effective Tips To Remove Hair From Face

  अनेक मुली आणि महिला चेह-यावरील नको असलेल्या केसांमुळे त्रस्त असतात. हे नको असलेले केस दूर करण्यासाठी त्या घरात सहज उपलब्ध होणा-या गोष्टींचा वापर करतात. यामुळे चेह-याचा रंग उजळतो. ब्यूटी एक्सपर्ट शीला एन. किशोर सांगत आहेत अशाच 10 टिप्स ज्या चेह-यावरील नको असलेले केस दूर करण्यात मदत करतील...

  - हळद पावडर, गव्हाचे जाड पीठ आणि कच्चे दूध मिसळून चेह-यावर लावल्याने नको असलेले केस दूर होतात.


  - अंड्याच्या बलकामध्ये कॉर्न फ्लोर आणि साखर मिसळून चेह-यावर लावल्याने नको असलेल्या केसांपासून सुटका मिळते.


  - मसूरची डाळ, कच्चा बटाटा, मध आणि लिंबूचा रस मिसळून चेह-याच्या केसांवर लावा. यामुळे केस दूर होतील आणि रंग गोरा होईल.


  - गव्हाच्या जाड पीठामध्ये गुलाबजल आणि दूध मिसळून चेह-यावर लावल्याने नको असलेले केस दूर होतात.


  - लिंबूचे साल बारीक करुन घ्या. यामध्ये ओटमील आणि ऑलिव ऑइल मिसळून चेह-यावर - लावल्याने चेह-याचे केस रिमूव्ह होतात.

  - जवसाच्या पीठामध्ये लिंबूचा रस आणि कच्चे दूध मिसळून लावल्याने चेह-यावरील केस दूर होतात.

  - बडीशोप आणि मुगाची डाळ बारीक करुन घ्या. हे पाण्यात मिसळून चेह-यावर लावल्याने नको असलेल्या केसांपासून सुटका मिळते.

  - हरब-याची डाळ पाण्यात भिजवून बारीक करा. यामध्ये हळद मिसळून चेह-यावर लावल्याने चेह-याचे केस दूर होतात आणि फेयरनेस वाढतो.

  - ओट्समध्ये मध आणि लिंबूचा रस मिसळून चेह-यावर लावल्याने चेह-याच्या केसांपासून सुटका मिळते.

  - अंड्याच्या पांढ-या भागात मैदा आणि साखर मिसळून चेह-यावर लावल्याने केस गळतात. हे लावल्याने चेह-यावर शायनिंग येते.

Trending