आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health: अंघोळीच्या पाण्यात मिसळा हे पदार्थ, अनेक आरोग्य समस्या होतील दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोक अंघोळीसाठी साध्या पाण्याचा वापर करतात. परंतु आयुर्वेदानुसार या पाण्यात महत्त्वाचे पदार्थ मिसळले तर अनेक हेल्थ प्रॉब्लम टाळता येऊ शकतात. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरच्या आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. गोविंद पारिक सांगत आहेत, अंघोळीच्या वेळी यूज केल्या जाणा-या काही घरगुती उपायांविषयी सविस्तर...


तुरटी आणि काळे मीठ
एक बकेट पाण्यात एक-एक चमचा तुरटी आणि काळे मिसळून अंघोळ करा. यामुळे बॉडीचे ब्लड सर्कुलेशन सुधारेल, ज्यामुळे स्ट्रेस आणि मसल्स पेन दूर होईल.


लिंबाची पाने
एक ग्लास पाण्यात 8-10 लिंबाचे पाने उकळा. गार झाल्यानंतर गाळून घ्या. हे एक बकेट पाण्यात मिसळून अंघोळ करा. स्किन इन्फेक्शन आणि सूज दूर होईल.


गुलाब जल
एक बकेट पाण्यात 3-4 चमचे गुलाब जल मिसळून अंघोळ करा. यामुळे मसल्स रिलॅक्स होतील, यासोबतच बॉडीची दुर्गंधी दूर होईल.


संत्रीचे साल
एक बकेट कोमट पाण्यात दोन संत्रींचे साल टाका. 10 मिनिटानंतर हे काढून अंघोळ करा. यामुळे मसल्स पेन आणि स्किन इन्फेक्शन दूर होईल.


कापूर
एक बकेट पाण्यात कापूराचे 2-3 तुकडे टाकून मिसळा. याने अंघोळ केल्याने बॉडी रिलॅक्स होते आणि डोकेदुखीची समस्या दूर होते.
 

हळद
एक चमचा कच्च्या हळदीची पेस्ट बनवा. हे एक बकेट पाण्यात मिसळून अंघोळ करा. स्किन डिसिजचा धोका टळेल.
 

चंदन
रात्री झोपण्याअगोदर एक वाटी पाण्यात चिमुटभर चंदन टाकून ठेवा. सकाळी हे एक बकेट पाण्यात मिसळून अंघोळ करा. यामुळे स्किन इन्फेक्शन दूर होईल.
 

बातम्या आणखी आहेत...