Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Health Benefits Of Jaggery

Health: साखरेऐवजी गुळ खाणे आरोग्यवर्धक, होतात हे फायदे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 29, 2018, 12:00 AM IST

गुळाचा वापर सामान्यतः पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. परंतु हिवाळ्यात याचा वापर साखरेऐवजी केला तर अनेक आरोग्य फायद

 • Health Benefits Of Jaggery

  गुळाचा वापर सामान्यतः पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. परंतु हिवाळ्यात याचा वापर साखरेऐवजी केला तर अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात. यामधील व्हिटॅमिन, मिनरल्स, न्यूट्रीएंट्स आणि आयरन अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर ठेवण्यात मदत करतात. येथे एम्सचे आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. शक्ति सिंह परिहार सांगत आहेत रोज गुळ खाण्याच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

  सर्दी-पडसे
  गुळ हे गरम असते. हे खाल्ल्याने सर्दी-पडस्याची समस्या दूर होते.


  बॉडी पेन
  गुळ खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन सुधारते. यामुळे आखडलेल्या मसल्सपासून आराम मिळतो आणि बॉडी पेन कमी होतो.

  अॅसिडिटी
  गुळ अॅसिडचा इफेक्ट पडू देत नाही. हे नियमित जेवणानंतर खाल्ल्याने पोट फूगणे आणि अॅसिडिटीची समस्या दूर होते.

  बॉडी डिटॉक्स
  गुळ खाल्ल्याने बॉडीचे टॉक्सिन्स बाहेर निघतात. याने पुर्ण बॉडी डिटॉक्स होते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.

  बध्दकोष्ठता
  नियमित जेवणानंतर गुळ खाल्ल्याने डायजेशन सुधारते. यामुळे बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते.

  रक्ताची कमतरता
  गुळामध्ये न्यूट्रिएंट्स भरपूर असतात. हे रेड ब्लड सेल्स हेल्दी ठेवते आणि रक्ताची कमतरता टाळते.

  डोकेदुखी
  गुळ खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन सुधारते. यामुळे डोकेदुखीची समस्या दूर होते.

  पोटदुखी
  गुळ डायजेशन सुधारते. यामुळे पोटदुखीची समस्या दूर होते.

  हेल्दी स्किन
  नियमित गुळ खाल्ल्याने बॉडीचे वेस्ट बाहेर निघते. यामुळे ब्लड शुध्द होते आणि स्किन हेल्दी राहते.

Trending