आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लाइफस्टाइल - सर्वच साप विषारी नसतात, परंतु त्यांच्या विषाहून भीतीच अधिक मारक ठरत असते. साप चावल्याने होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंतेची बाब ठरत आहे. याप्रकरणी अधिक माहिती घेतली असता तज्ज्ञ म्हणाले की, सापांविषयी बेसिक माहिती नसल्यामुळे काही जण दवाखान्याऐवजी घरीच इलाज करण्याचा प्रयत्न करतात, यामुळे मृत्यू होण्याची शक्यता बळावते.
साप चावल्यावर टाळा या 5 चुका...
- यूपीच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या टॉक्सिकॉलॉजी डिपार्टमेंटचे प्राध्यापक मौसमी सिंह म्हणाल्या, साप चावल्यानंतर होणाऱ्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण भीती आहे.
येथीलच सहायक प्राध्यापक डॉ. शिअली म्हणाले, रसेल्स वायपर (सापाची प्रजात) हिमोटॉक्सिकवर हल्ला करतो. तर क्रेट आणि कोब्रा न्यूरोवर हल्ला करतात. तथापि, सर्व विषारी साप माणसाच्या शरीरात खूप कमी विष सोडतात. म्हणून दंश झालेल्या व्यक्तीने अजिबात घाबरून जाऊ नये.
सापांचे विष तीन प्रकारचे असतात
1- हिमोटॉक्सिक - हे विष रक्त कोशिकांवर हल्ला करते. शरीरात अनेक जागी रक्तस्रावाचे लक्षण, रक्ताची उलटी.
2- न्यूरोटॉक्सिक - हे विष शरीराच्या चेतासंस्थेवर हल्ला करते.
3- मायोटॉक्सिक - हे विष समुद्रातील प्राण्यांत आढळते, यामुळे देशात यामुळे होणाऱ्या दंशाची संख्या खूप कमी आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, साप चावल्यावर कोणत्या 5 चुका टाळाव्यात...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.