आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

What Is Life Support System? यावर ठेवल्यानंतर व्यक्ति जिवंत राहू शकते काय?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी मागील 9 आठवड्यांपासून दिल्लीतील 'एम्स' हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. त्यांना किडनी आणि यूरिनरी इंफेक्शन होते. अखेर गुरुवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. 'एम्स'ने प्रेस रिलीज करून त्यांचे निधन झाल्याचे अधिकृत जाहीर केले.

 

'एम्स'नुसार, मागील 24 तास त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती. त्यामुळे त्यांना 'लाइफ सपोर्ट सिस्टिम'वर (जीवनरक्षक प्रणाली) ठेवण्यात आले होते.

किडनी आणि यूरिनरी इंफेक्शनमुळे अटलजींना 11 जून रोजी एम्समध्ये अॅडमिट करण्‍यात आले होते. मधुमेहाने पीडित 93 वर्षीय अटल बिहारी यांची एक किडनी निकामी झाली होती. 2009 मध्ये आलेल्या स्ट्रोकमुळे त्यांची विचार करण्‍याची क्षमता लोप पावली होती. नंतर त्यांना डिमेंशिया (स्मृतीभ्रंश) झाला. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखीनच खालावली होती. हळूहळू त्यांनी स्वत:ला सार्वजनिक जीवनापासून लांब ठेवले होते. याअनुषंगाने आम्ही आपल्याला 'लाइफ सपोर्ट सिस्टिम' आणि 'डिमेंशिया'बाबत महत्त्वपूर्ण माहिती घेवून आलो आहे.

 

4 मुद्द्यांमध्ये जाणून घ्या...'लाइफ सपोर्ट सिस्टिमविषयी...
1- काय आहे लाइफ सपोर्ट सिस्टिम

शरीर प्रसन्नचित ठेवण्यासाठी कार्यान्वीत असलेल्या अवयव आणि त्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी लाइफ सपोर्ट सिस्टिमची महत्त्वपूर्ण भूमिका असते. परंतु अवयव निकामी होतात, ते कार्य करणे बंद करतात तेव्हा मात्र, अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवयवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'लाइफ सपोर्ट सिस्टिम'ची मदत घेतली जाते. ही सिस्टिम रुग्णाला ‍जिवंत ठेवण्यासोबतच त्याला लवकर बरे करण्‍यासही मदतगार ठरते. परंतु, यात प्रत्येक वेळी यश येईलच असे नाही, काही रुग्णांना लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवल्यानंतरही त्यांचे शरीर साथ देत नाही.

 

2- कोणता अवयव निकामी झाल्यानंतर पडते गरज...
शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी झाल्यानंतर रुग्णाला लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्‍याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यात...
-फुप्फुसे, निमोनिया, ड्रग ओव्हरडोस, ब्लड क्लॉट, सीओपीडी, सिस्टिक फाइब्रोसिस,
- हृदय अचानक बंद पडल्यानंतर (काडियक अरेस्ट किंवा हार्ट अटॅक)
- ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर

 

3- लाइफ सपोर्ट कसे करतात...?
- रुग्णाची प्रकृती खालवण्याचे कारणाचा शोध घेतल्यानंतर डॉक्टर त्याला लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्याचा निर्णय घेतात. रुग्णाला व्हेंटीलेटरवर ठेऊन त्याला आधी ऑक्सिजन दिला जातो. नंतर एक ट्यूब नाक किंवा तोंडात टाकून ती इलेक्ट्रिक पंपाला जोडतात. रुग्णाला आराम मिळावा म्हणून त्याला झोपेचे औषधही दिले जाते.  
- बंद पडलेले हृदय पुन्हा कार्यान्वीत करण्‍याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी सीपीआर दिला जातो. रक्त आणि ऑक्सिजन रुग्णाच्या संपूर्ण शरीरात सोडला जातो. यासाठी त्याला इलेक्ट्रिक शॉकही दिला जातो. यासोबत आवश्यक औषधीही दिली जाते.
- डायलिसिस देखील 'लाइफ सपोर्ट सिस्टिम'चाच एक भाग आहे. किडनी 80-90 टक्के निकामी झालेल्या रुग्णावर डायलिसिस केले जाते. शरीरातील खराब झालेले रक्त तसेच पदार्थ फिल्टर करून बाहेर काढले जाते. एका नळीच्या मदतीने रुग्णाच्या शरीरात पाणी आणि पोषक तत्वे दिले जातात.

 

4- 'लाइफ सपोर्ट सिस्टिम' केव्हा काढले जाते...?
दोन स्थितीत रुग्णाचे सपोर्ट सिस्टिम काढले जाते. पहिल्या स्थितीत, रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसत असल्यास, अवयव सुरळीत काम करत असलेल्या रुग्णाचे लाइफ सपोर्ट सिस्टिम काढण्यात येते. दुसर्‍या स्थितीत, रुग्‍णाच्या प्रकतीत कुठलीही सुधारणा दिसत नसल्यास, शरीर उपचाराला साथ देत नसल्यास  डॉक्टर्स त्याच्या नातेवाइकांच्या परवानगीने सपोर्ट सिस्टिम काढतात. परंतु, रुग्णाच्या शेवटच्या श्वासापर्यंत उपचार सुरु ठेवतात.

 

जाणून घ्या... 'डिमेंशिया'विषयी..
एखाद्या व्यक्तिला त्याच्या दैनंदिन जीवनात घडणार्‍या गोष्ट आठवत नाही. काय जेवण केले, आपण कुठे राहातो, हे देखील लक्षात राहात नाही, अशा लोक डिमेंशियाने (स्मृतिभ्रंश) पीडित असतात. त्याच्या मेंदूवरील काही सुरकुत्या पुसल्या जातात. अशा व्यक्तिची विचार करण्‍याची शक्ती लोप पावते. त्याच्या स्वभावातही बदल झालेला जाणवतो. ब्लड प्रेशर, डायबीटीज, स्मोकिंग, ट्यूमर, टीबी, स्लीप एप्निया, विटमिनच्या कमतरतेमुळे स्मृतीभ्रंश होता.
तसेच औषधींच्या अतिसेवनामुळेही तसेच साइड इफेक्टमुळे स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता असते. स्मृतीभ्रंश झाल्यास न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा.

 

बातम्या आणखी आहेत...