आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 2 महिला नसत्या तर बुद्ध नसते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुद्धांच्या जीवनात दाेन स्त्रियांना महत्त्वाचे स्थान अाहे. एक त्यांची मावशी महापजापती गौतमी व दुसरी सुजाता जी त्यांच्या आत्मिक जन्माचे निमित्त ठरली. बुद्धांच्या जन्मदात्या अाईंचे त्यांच्या जन्मानंतर निधन झाले. त्यांच्या मावशीने दूध पाजून त्यांचे पोषण केले. त्यांच्यांसाठी गौतमींनी अापल्या नवजात पुत्रास दुसऱ्याकडे साेपवले अाणि स्वत: बालक   सिद्धार्थ यांचे पालन पाेषण करू लागल्या. पुढे जाऊन गौतमी यांनी बुद्ध यांच्याकडून दीक्षा घेण्याची जिद्द केली. त्यामुळे संघात महिलेचा प्रवेश झाला अाणि त्या बुद्धत्वासाठी मिळाल्या. 


दुसरी घटना अशी अाहे की, बुद्ध दिवस- रात्र न थांबता ध्यान करत हाेते. त्यामुळे त्यांचे शरीर उपवास व तपस्यामुळेे क्षीण, अस्थिपंजर झाले हाेते. एका पाैर्णिमेस त्यांनी सर्व नियम ताेडण्याचा निश्चय केला अाणि ते सहज भावमध्ये बसले हाेते. सकाळच्या वेळी सुजाता नावाच्या महिलेने अापली मनाेकामना पूर्ण करण्यासाठी खीर बनवून अाणली. बुद्धांना पाहून त्यांना वाटले, वृक्ष देवता प्रकट झाले अाहे. त्यांनी त्यांनाच ताे प्रसाद चढवला अाणि खीर खाण्याची विनंती करू लागले. बुद्धांनी त्यांची विनंती स्वीकारून त्यांच्या हाताने खीर खाल्ली. त्याच दिवशी त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले. त्या दिवशी सुजाता यांनी त्यांना खीर दिली नसती तर त्यांचे शरीर नष्ट झाले असते. काही वर्षांनी बुद्ध सुजाता यांच्या गावी गेले अाणि त्यांनी त्यांना धर्माची दीक्षा दिली. या दाेन महिलांचे बुद्धांनी ॠण फेडले. 

 

बातम्या आणखी आहेत...