आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Health: तुम्ही कांद्याचे साल फेकून देता का? हे आहेत याचे 5 फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक भाजीही आरोग्यासाठी फायदेशीर असते. याचे काहीना काही फायदे असतातच. फळ आणि भाज्यांसोबतच याचे सालही तितकेच फायदेशीर असतात. यामुळे फळ आणि भाज्यांचे साल फेकण्याची गरज नाही. तुम्ही त्याचा वापर करु शकता. आज आम्ही तुम्हाला कांद्याच्या सालीचे काही फायदे सांगणार आहोत.

 

कसा करावा वापर कांद्याच्या सालीचा?
- कांद्याच्या सालांमध्ये नॅचरल हेयर डाय करणारे गुण असतात. 
- तुम्हाला खायचे असेल तर सूप तयार करताना यामध्ये कांद्याचे साल टाकावे. परंतु सर्व करताना हे साल काढून घ्या.  
- तुम्ही ग्रीन टी किंवा हर्बल टीमध्ये कांद्याचे साल टाकू शकता. कांद्याच्या सालीचा वापर करताना ऑर्गेनिक कांद्याचाच वापर करा. केमिकल्स आणि पेस्टिसाइड्सयुक्त सालींचा वापर केल्याने नुकसान होऊ शकते. 

 

आज आपण कांद्याच्या सालीचे काही फायदे जाणुन घेऊया...


1. अँटी-ऑक्सीडेंट्सयुक्त
रिसर्चनुसार कांद्याच्या सालीचा वापर करणे चांगले असते. यामध्ये इतर फळ-भाज्यांच्या तुलनेत जास्त अँटी-ऑक्सीडेंट्स असतात. हे आपले शरीर आतून स्वच्छ करतात आणि इम्यूनिटी वाढवतात.

 

2. हार्ट अटॅकपासून बचाव
यामध्ये क्वैरसेटीन नामक फ्लेवोनोल अधिक प्रमाणात असतात. हे ब्लड प्रेशर कमी करते आणि आर्टरीज स्वच्छ करुन हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी करते.

 

3. कँसरचा धोका कमी 
'द जर्नल प्लांट फूड्स फॉर ह्यूमन न्यूट्रिशन' मध्ये पब्लिश केलेल्या एका स्टडीनुसार कांद्याच्या सालीमध्ये फायबर असतात. यासोबतच फ्लेवोनोइड्स, क्वैरसेटीन आणि फीनोलिक सारखे कम्पाउंड्स असतात.

 

4. घश्याची खवखव
तुमचा घसा खराब असेल तर पाण्यात कांद्याचे काही साल टाकून उकळून घ्या. हे गाळुन या पाण्याने गुळण्या करा. यामुळे घश्याला आराम मिळेल. तुम्ही चहा तयार करताना त्यामध्ये कांद्याचे साल टाकू शकता. यामुळे घश्याला फायदा होईल.

 

5. चेहरा स्वच्छ करण्यासाठी
कांद्याच्या ज्या सालमध्ये रस असेल अशा सालचा वापर करा. हे हळदीमध्ये मिक्स करा आणि चेह-यावर लावा. असे केल्याने चेह-याचे डाग दूर होतील आणि चेहरा ग्लोइंग होईल.

 

बातम्या आणखी आहेत...