Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | 8 Bad Habits That Damage Your Brain

मेंदूला खराब करतात या आठ वाईट सवयी; वेळीच ओळखा!

हेल्थ डेस्क | Update - Jul 24, 2018, 12:05 AM IST

फक्त जखम झाल्यावर किंवा चुकीच्या औषधींमुळेच मेंदूला नुकसान पोहोचते असे नाही. दिवसभराच्या धावपळीत आपण अशा चुका करतो ज्याच

 • 8 Bad Habits That Damage Your Brain

  फक्त जखम झाल्यावर किंवा चुकीच्या औषधींमुळेच मेंदूला नुकसान पोहोचते असे नाही. दिवसभराच्या धावपळीत आपण अशा चुका करतो ज्याचा आपल्या मेंदूवर वाईट प्रभाव पडतो. आज आम्ही अशाच आठ वाईट सवयींविषयी सांगणार आहोत, ज्या मेंदूवर वाईट प्रभाव टाकतात.


  1. भरपूर झोप न घेणे
  कमीत कमी सात तासांची झोप न घेतल्याने मेंदूला आराम मिळत नाही. वेळेबरोबरच मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होते. याचा वाईट प्रभाव पडू शकतो.


  2. जास्त काळ एकटे राहणे
  जास्तीत जास्त एकटे राहिल्याने मेंदूवर वाईट प्रभाव पडतो. यामुळे भविष्यात अल्झायमरचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शक्यतो एकटे राहणे टाळावे.


  3. मोठ्या आवाजात गाणे ऐकणे
  सतत अनेक तास हेडफोन किंवा इयरफोनमध्ये मोठ्या आवाजात गाणे ऐकल्याने मेंदूच्या पेशींवर वाईट प्रभाव पडतो. यामुळे अल्झायमरची समस्या होऊ शकते.


  4. जंक फूड जास्त खाणे
  जंक फूडमध्ये सोडियम अधिक प्रमाणात असते. जे मेंदूच्या न्यूरॉन रिसेप्टर्सला नुकसान पोहोचवते. जंक फूड जास्त खाल्ल्याने गांेधळाची स्थिती, डोकेदुखी आणि उलटीसारख्या समस्या होऊ शकतात.


  5. सूर्यप्रकाशात न राहणे
  जास्त वेळ अंधारात राहिल्याने त्याचा मेंदूवर वाईट प्रभाव पडतो. सूर्यप्रकाश हा मेंदूसाठी खूप महत्त्वाचा असतो. अंधारामुळे मेंदूची विचारक्षमता कमी होऊ शकते.


  6. व्यग्र न राहणे
  नियमित कोणतीही शारीरिक हालचाल न केल्याने डायबिटीज, हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाची समस्या वाढते. याचा मेंदूवर वाईट प्रभाव पडतो.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मेंदूला खराब करणाऱ्या इतर दोन वाईट सवयी...

 • 8 Bad Habits That Damage Your Brain

  7. धूम्रपान करणे 
  धूम्रपान करताना आपल्या शरीरामध्ये वाईट केमिकल्स जातात. हे रक्त घट्ट करतात. त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो आणि त्याला धोकाही पोहोचतो. 

 • 8 Bad Habits That Damage Your Brain

  8. जास्त खाणे 
  जास्त म्हणजेच अतिरिक्त आहाराचा संबंध थेट मेंदूशी असतो. जास्त खाल्ल्याने मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्याचा वाईट प्रभावही पडू शकतो. 

Trending