आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशान खट्टरने असे बनवले सिक्स पॅक एब, वाचा फिटनेस सीक्रेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क: अभिनेता ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांचा 'धडक' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. काल चित्रपटाच्या एका गाण्याचे टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आले. यामध्ये ईशान जान्हवीची दमदार लव्ह केमेस्ट्री दिसली. चित्रपटात ईशान खुप परफेक्ट दिसतोय. ईशानने आपला डेब्यू चित्रपट बियॉन्ड द क्लाउड्ससाठी 12 दिवसांमध्ये 8 किलो वजन कमी करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. ईशानला फिट राहण्यासाठी स्प्रिंटिंग आणि साइकलिंग करायला आवडते. आज आपण ईशान खट्टरचा फिटनेस आणि डायट प्लान जाणून घेणार आहोत.


फिटनेस : मसल्स स्ट्रेंथ आणि फ्लेक्सिबिलिटीवर फोकस
आठवड्यातून 6 दिवस वर्कआउट करणारा ईशान रोज जिममध्ये 2 तास घालवतो. यावेळी तो मसल स्ट्रेंथ आणि फ्लेक्सिबिलिटीवर फोकस करतो. वर्कआउटसोबतच तो स्प्रिंटिग आणि साइकलिंगही करतो. शूटिंगच्या काळातही ईशान हल्के-फुल्के वर्कआउट करताना दिसतो. ईशानला डान्स खुप आवडतो. तो डान्सला एकप्रकारचे वर्कआउट मानतो.

 

डायट : नारळ पाणी खुप आवडते
ईशान वजन वाढू नये याची विशेष काळजी घेतो. यासाठी तो डायटमध्ये फळं आणि भाज्यांचा जास्त समावेश करतो. ईशानला कोकोनट वॉटर खुप आवडते. तो हाय इंटेंसिटी वर्कआउट जास्त करतो. यासाठी तो डायटमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थ अंडी, चिकन आणि प्रोटीन शेक घेतो. ईशान सांगतो की, दिर्घकाळ फिट राहायचे असेल तर चंक फूडपासून दूर राहावे.

 

सल्ला - तणाव घेऊ नका, राग आणि एर्जीन वर्कआउटवर काढा
ईशान सांगतो की, किती दबाव असला तरी तणाव घेऊ नये. असे जास्त झाल्यावर वर्कआउटवर फोकस करा. यामुळे तणाव कमी होईल. यासोबतच आपला राग आणि एनर्जी वर्कआउटवर काढा. म्यूझिकसोबतच एक्सरसाइज केली तर तणावाचा स्तर कमी होईल. झोपेवर कधीच समझौता करु नका. नियमित 7 तासांची झोप घ्या. निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...