Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Akshay Kumar Body Fitness Workout, Diet Secrets

वयाच्या 50 व्या वर्षी जबरदस्त फिट आहे अक्षय कुमार, कधीच मोडत नाही हे 9 Rules

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 31, 2018, 02:20 PM IST

वयाच्या 50 व्या वर्षीही अक्षय कुमार जबरदस्त फिट आहे. संपुर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये तो पार्टीज आणि अल्कोहलपासून दूर राहण

 • Akshay Kumar Body Fitness Workout, Diet Secrets

  हेल्थ डेस्क: वयाच्या 50 व्या वर्षीही अक्षय कुमार जबरदस्त फिट आहे. संपुर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये तो पार्टीज आणि अल्कोहलपासून दूर राहण्यासाठी ओळखला जातो. तो नियमित सकाळी 4.30 वाजता उठतो आणि रात्री 9 वाजता झोपतो. तो नाइट शिफ्ट अव्हॉइड करत असतो. आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी तो आठवड्यातून दोन-तीन वेळा बास्केटबॉल खेळतो. वेळ मिळाल्यावर तो मुलासोबत स्विमिंगही करतो. आपले फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी तो 9 नियम अनेक वर्षांपासून फॉलो करतोय. 15 ऑगस्टला त्याचा गोल्ड चित्रपट रिलीज होणार आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला अक्षय कुमार कसा फिट राहतो याविषयी सांगणार आहोत.

  डायटमध्ये काय घेतो
  - ब्रेकफास्ट : पराठा, एक ग्लास दूध, ज्यूस किंवा मिल्कशेक आणि अंडी
  - स्नॅक्स : फ्रूट्स, ड्राय फ्रूट्स आणि मिक्स हिरव्या भाज्या
  - लंच : डाळ, चपाती, हिरव्या भाज्या बॉइल्ड चिकन आणि दही
  - डिनर : सूप, हिरव्या भाज्या आणि सलाद
  - त्याला ब्राउन राइस खायला आवडते.

  हे 9 नियम करतो फॉलो
  - तो संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत डिनर करुन घेतो. झोपण्याच्या 4-5 तासांपुर्वी जेवूण घ्यावे असे तो मानतो. यामुळे जेवण पुर्णपणे डायजेस्ट होण्यास वेळ मिळतो.
  - तो प्रोटीन शेक घेत नाही. यामुळे दिर्घकाळानंतर दुष्परिणाम होतात असे तो मानतो.
  - तो साखर आणि मीठ मर्यादित प्रमाणात खातो. हेल्दी राहण्यासाठी हे आवश्यक असल्याचे तो मानतो.
  - तो निमयित कमीत कमी अर्धा तास मेडिटेशन करतो. यामुळे शांती मिळते आणि स्ट्रेस लेव्हल कमी होते.
  - तो आपल्यासोबत नट्स आणि फ्रूट्स ठेवतो. जेव्हा भूक लागेल तेव्हा हे पदार्थ खातो.
  - दिवसभरात तो 4 ते 5 लीटर पाणी पितो.
  - मेटाबॉलिज्म रेट वाढवणारे पदार्थ तो खातो. तो मानतो की, मेटाबॉलिज्म योग्य असेल तर फिटनेस राहतो आणि वजन वाढत नाही.
  - तो कधीच जास्त जेवण करत नाही. तो थोड्या-थोड्या अंतराने खातो.
  - ज्यावेळी तो एक्सरसाइज करत नाही तेव्हा तो 15 ते 20 मिनिटे क्विक वॉक घेतो. रोज तो काहीना काही फिजिकल अॅक्टिव्हिटी अवश्य करतो.

Trending